Healthy Seeds for men: ‘या’ बिया आहेत पुरूषांसाठी पॉवर सेंटर, शरीराला मिळेल स्फूर्ती आणि ताकद, दूर पळतील गंभीर आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Healthy Seeds for men: आपल्याकडे जसे मसाल्यांचे आरोग्यदायी फायदे आहेत तसंच काही फळांच्या बिया पुरूषांसाठी आरोग्यदायी आहे. या बियां ‘योग्य प्रमाणात’ खाल्ल्याने पुरूषांना अनेक फायदे होतील. मानसिक,शारीरिक थकवा दूर करण्यापासून ते स्नायूंना मजबूत करण्यापर्यंत या बिया फायद्याच्या ठरू शकतात. वैद्यकीय सल्ल्यानुसार या बियांच्या प्रमाणबद्ध वापर केल्याने हृदयरोगापासून ते शुक्राणूंपर्यंतच्या लैंगिक आजारांना दूर ठेवता येतं. जाणून घेऊयात पुरूषांसाठी या आरोग्यदायी आणि शक्तीवर्धक बियां कोणत्या आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत ते.
advertisement
advertisement
advertisement
खरबूजाच्या बिया (Muskmelon seeds): खरबूजाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळून येतं जे रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतं.तरुण वयात हृदयविकाराच्या वाढत्या तक्रारींवर खरबूज बियांसहीत खाणं फायद्याचं ठरतं. या बिया खरबूजासोबत, त्या सुकवून आणि भाजून किंवा सूर आणि भाज्यांमध्ये टाकून खाता येतात.
advertisement
advertisement
सूर्यफुलाच्या बिया (Sunflower seeds): मानसिक तणाव दूर करण्यात सूर्यफुलांच्या बिया महत्त्वाची भूमिका बजावतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या प्रोटिन्स, व्हिटॅमिन ई, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे जळजळीचा त्रास दूर व्हायला मदत होते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यात सूर्यफुलाच्या बिया फायद्याच्या ठरू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून काही दिवस सूर्यफुलाच्या बिया खाणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement