brahma yog: तो दिवस आला, आजपासून तयार झाला ब्रह्म योग, 5 राशींचं नशीब पालटणार!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
भगवान विष्णूला समर्पित असलेला हा गुरुवारचा दिवस पाच राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरणार आहे. या व्यक्तींवर श्रीहरी अर्थात विष्णूची मोठी कृपा राहील.
दोन मे 2024 रोजी चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत गोचर करणार आहे. याच दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोगही बनत आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेला हा गुरुवारचा दिवस पाच राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरणार आहे. या व्यक्तींवर श्रीहरी अर्थात विष्णूची मोठी कृपा राहील. या व्यक्तींना जीवनात नशिबाची साथ मिळेल, धन-धान्याची वृद्धी होईल. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊ या.
advertisement
सिंह : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा, अर्थात दोन मे हा दिवस शुभ फलदायी आहे. धन-धान्य वाढेल. उद्दिष्टपूर्तीची वाटचाल सोपी होईल. प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीमुळे मोठा लाभ होईल. सिंगल व्यक्तींना जोडीदार मिळू शकतो. सगळी कामं अगदी सहजपणे होत जातील. अधिकारी वर्गाची साथ मिळेल. तसंच, वैवाहिक जीवनही चांगलं राहील.
advertisement
मीन : दोन मे हा दिवस मीन राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. नवे संपर्क प्रस्थापित होतील आणि त्यांच्या माध्यमातून मोठा लाभही होईल. नशिबाच्या मदतीने सारी कामं पूर्ण होतील. आर्थिक समृद्धी वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुवर्णसंधी मिळू शकेल. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. एखादी अत्यंत महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. गुंतवणूकही करू शकाल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement