ग्रहांचा राजकुमार कमाल करेल, मे महिन्यातच सूर्याच्या साथीने 3 राशींचं नशीब उजळवेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा अनेक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. कारण बुध ग्रहाला बुद्धी, तर्कशास्त्र, व्यापार, नोकरी आणि प्रगतीचा कारक मानलं जातं. आता येत्या काही दिवसांतच त्याचं राशीपरिवर्तन होणार आहे. त्यामुळे काही भाग्यवान राशींची भरभराट होईल हे निश्चित. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
advertisement
धनू : जेव्हा बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होईल, तेव्हाच आपला सुखद काळ सुरू झालेला असेल. विशेषतः कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. समाजातही खूप मान मिळेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असल्यामुळे चांगली बचत होईल. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा बढती मिळण्याचीही शक्यता आहे.
advertisement
मकर : विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय फायदेशीर असेल, त्यांचा अभ्यास उत्तम होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असाल, तर आता चांगली संधी मिळू शकते. व्यापार विस्तारेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)