ज्या पैशांची पाहिली वाट, ते आता मिळण्याची शक्यता; यात आहे का तुमची रास?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. काहीवेळा याच प्रवेशातून शुभ योग जुळून येतात. 30 मे रोजी वृषभ राशीत गुरू आणि शुक्र ग्रह एकत्र आले. म्हणजेच त्यांची युती झाली. अशात गजलक्ष्मी राजयोगासह शश योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. यातून काही राशींचं नशीब पार उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू, शुक्र युतीतून गजलक्ष्मी योग निर्माण झाला असून कुंभ राशीत चंद्र आणि शनी आल्यामुळे शश आणि धनिष्ठा नक्षत्राचा योग निर्माण झाला आहे. आता याचा शुभ प्रभाव 5 राशींच्या व्यक्तींवर पडेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन : या काळात आपल्या करियरसंदर्भातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. मागील बऱ्याच काळापासून आपण ज्या पैशांची वाट पाहत होतात, ते पैसे आता आपल्या हातात येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. व्यापार विस्तारेल. आपल्या आईच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
advertisement