मे महिन्यात भरभरून सुख मिळेल! अयोध्येच्या ज्योतिषांची 3 राशींसाठी भविष्यवाणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचा राशीप्रवेश होतो. त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. त्यातून तो महिना कोणत्या राशींसाठी सकारात्मक आणि कोणत्या राशींसाठी नकारात्मक असेल हे ठरतं. आता मे महिना कोणासाठी सुखाचा असणार, पाहूया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
उत्तर प्रदेशच्या ज्या शहरात श्रीरामांचं भव्य मंदिर वसलंय त्या अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, मे महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांची चाल, स्थिती बदलणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवगुरू गुरू ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल. हा राशीप्रवेश तब्बल 18 वर्षांनंतर होणार आहे. 3 मेला याच राशीत गुरू अस्त होईल. तर, 10 मे रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होईल. असं म्हणतात की, कुंडलीत बुध ग्रहाचं स्थान मजबूत असले तरच आयुष्य सुख-सुविधांनी संपन्न असतं. हे समीकरण वर्षानुवर्षांचं आहे. तसंच 14 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल. तर, 19 मे रोजी शुक्र मेष राशीतून निघून आपल्या वृषभ राशीत जाईल. म्हणजेच वृषभ राशीत गुरू आणि शुक्राची युती होणार आहे. याचा काही राशींना भरभरून फायदा मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)