Vat Purnima Vrat 2024: सौभाग्य लाभतं..! वडाची पूजा केल्यानंतर या 4 गोष्टींचं दान शुभ फळदायी

Last Updated:
Vat Purnima Vrat 2024: हिंदू दिनदर्शिकेतील तिसरा महिना असलेल्या ज्येष्ठात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. हे व्रत पाळल्यानं सौभाग्य लाभते, संतती सुखाचा आनंद मिळतो, असे मानले जाते. 21 जून, शुक्रवारी म्हणजेच आज हे व्रत आहे. या दिवशी वटवृक्षाची (वडाची) पूजा करून प्रदक्षिणा काढून आशीर्वाद घेतले जातात.
1/5
या दिवशी पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार दान देण्याची परंपरा आहे. काही गोष्टींचे दान केल्याने शुभ फळ मिळते, असे मानले जाते. या गोष्टी दान केल्यानं आपलं नशीबही उजळू शकतं. या गोष्टी काय आहेत? जाणून घेऊया ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांच्याकडून..

advertisement
2/5
जलदान - वटपौर्णिमा ही जेष्ठ महिन्यात येत असल्याने या काळात उष्णता जास्त असते. यामुळे आपण जलदान करू शकता. यासाठी, तुम्ही तहानलेल्या वाटसरूंसाठी पाण्याची व्यवस्था करू शकता किंवा गरजेच्या ठिकाणी पाणी वाटप करू शकता (रुग्णालय, इत्यादी). याचे शुभ परिणामही तुम्हाला मिळतील.

3/5
अन्नदान - अन्नदान केव्हाही करणं चांगलंच मानलं जातं. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहते. पण, वट पौर्णिमेला अन्नदान केल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबतच सर्व पापांचा नाश होऊन सुख-संपत्तीची प्राप्ती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

4/5
कपडे दान करणे - वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे दान करणे, शुभ मानले जाते. अनाथाश्रम किंवा गरीब व्यक्तींना कपडे दान करू शकता. असे केल्याने जीवनातील समस्या दूर राहतात आणि व्यक्तीला कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही.

5/5
मधदान - मध हे देवांचे अमृत मानले जाते, कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आजच्या दिवशी मधदान केल्यानं आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आजारांपासून दूर राहता येतं, म्हणून मधदान करावे. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement