Ajit Pawar Death : अपघात झाला तेव्हा अजित पवारांसह विमानात कोण कोण होतं? पाच जणांची नावं समोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ajit Pawar Passes Away : विमानात एकूण अजित पवारांसह पाच प्रवाशी होते. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला आहे.
Ajit Pawar Passes Away : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती मृत्यू झाला आहे. सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीये. विमानात एकूण पाच जण होते. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, ते विमान खासगी VSR कंपनीचे विमान होते, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी मुंबईतून सकाळी आठ वाजून 10 मिनिटांनी टेक ऑफ केलं होतं. तर 8 वाजून 50 मिनिटांनी लँडिंग करेल, अशी अपेक्षा होती.
अजित पवारांच्या विमानात कोण कोण होतं?
या विमानात एकूण अजित पवारांसह पाच प्रवाशी होते. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच कॅप्टन संभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला आहे. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील जीव वाचवता आला नाही.
advertisement
#WATCH | Crash landing in Baramati | Five people onboard the Mumbai-Baramati charter plane, including Maharashtra Deputy CM Ajit Pawar, died as per initial information by the DGCA.
Visuals from the spot show the wreckage of the aircraft. pic.twitter.com/GMmwrZwR0M
— ANI (@ANI) January 28, 2026
advertisement
समर्थकांना अश्रू अनावर झाले...
बारामतीतील रुग्णालयात मोठा जणसमुह पहायला मिळाला. अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहे. सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. रडता रडता ते गाडीतून बारामतीला रवाना झाले आहेत.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Death : अपघात झाला तेव्हा अजित पवारांसह विमानात कोण कोण होतं? पाच जणांची नावं समोर!









