शिवरायांच्या दिव्यांग मावळ्याने सर केला राजगड, पुण्यातील तरुणाच्या धैर्य अन् जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पंकज जगताप हा 24 वर्षीय तरुण पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील रहिवासी आहे. तसेच तो दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. तो वडिलोपार्जित शेती करतो. तसेच गावात छोटे किराणा दुकानही चालवतो.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : "जेव्हा तुम्ही उत्साही असता, तेव्हा डोंगरही मातीच्या ढिगासारखा दिसतो", असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय दिव्यांग असलेल्या पंकज जगताप याला पाहून येतो. दिव्यांगत्वावर मात करीत छत्रपती शिवरायांवरील निस्सीम भक्तीपोटी पंकज महादेव जगताप या पुरंदरच्या मावळ्याने भरपावसात वेल्हे तालुक्यातील दुर्गम राजगडावर चढाई केली.
पंकज जगताप हा 24 वर्षीय तरुण पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील रहिवासी आहे. तसेच तो दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. तो वडिलोपार्जित शेती करतो. तसेच गावात छोटे किराणा दुकानही चालवतो. पंकजने पाल खुर्द येथील शिवकालीन राजमार्गाने गडावरील चढाईला सुरुवात केली. डोंगर, कडेकपारीतील बिकट पायी मार्गाने तसेच निसरड्या पायऱ्या खडकांतुन दोन्ही हातांच्या साहाय्याने त्याने अडीच तासांत गड सर केला. या वेळी आंबळे येथील त्याचे मित्र शुभम ताडगे व ऋषिकेश जगताप त्याच्यासोबत होते.
advertisement
Rain in Maharashtra : राज्यात होणार पावसाचं दमदार पुनरागमन, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, अशी असणार परिस्थिती
अतिबिकट खडकांतून चढाई करताना मित्रांनी त्याला साथ देऊ केली. मात्र, पंकजने कोणाचीही साथ न घेता खडक, उंच पायऱ्यांवर हात टेकत जिद्दीने चढाई करीत सकाळी 10 वाजता तो गडाच्या पाली दरवाजात पोहचला. तेथे पायरीवर माथा टेकून पंकजने छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
advertisement
गड चढून झाल्यावर आपसूकच माझ्या तोंडातून 'शिवाजी महाराज की जय' हे शब्द निघाले, असं पंकजने म्हटलं. तसेच महाराजांनी बांधलेले सर्व किल्ले मला चढायचे आहेत, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
तुम्हीही बसल्या बसल्या पाय हलवता? आजच सुधारा ही सवय, नेमकं काय आहे यामागचं कारण?
राजगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राजसदरेत असलेल्यांनी जय शिवरायच्या जयघोषात पंकजचे स्वागत करण्यात आले. पंकजच्या या पराक्रमाचं पुणे जिल्ह्यात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 13, 2024 11:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
शिवरायांच्या दिव्यांग मावळ्याने सर केला राजगड, पुण्यातील तरुणाच्या धैर्य अन् जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट!