गरजू मुलांना दिवाळीचा आनंद देणारा उपक्रम; बाळासाहेब मालुसरे यांची समाजसेवा
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
बाळासाहेब मालुसरे यांनी सात वर्षांपासून सुरू केलेला उपक्रम गरीब मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतो.
प्राची केदारी-प्रतिनिधी, पुणे : प्रत्येकजण आपल्या घरात आनंदाने दिवाळी साजरी करत असतो. मात्र, समाजात असे अनेक घटक आहेत - गरीब, गरजू, रस्त्यावर राहणारी मुलं - ज्यांना या सणाचा आनंद मिळत नाही. या मुलांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा यासाठी पुण्यातील मंडई सांस्कृतिक कट्ट्याचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मुलांना स्वतः दुकानात नेऊन त्यांच्या पसंतीचे कपडे खरेदी करून देतात.
समाजातील लोकांचं आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. आपण आपल्या घरातल्यान आजूबाजूच्या लोकांना मदत करतो त्याच पद्धतीने यांना देखील मदत करून ती या गोष्टी पासून वंचित राहू नये हा या पाठीमागील उद्देश आहे.
advertisement
यंदाच्या दिवाळीत जवळपास ५० पेक्षा अधिक मुलांना त्यांनी कपडे देऊन दिवाळीचा आनंद मिळवून दिला. लक्ष्मी रोड येथे या मुलांना त्यांच्या आवडीचे कपडे खरेदी करून दिले जातात, तसेच त्यांना दिवाळी फराळाचा आस्वादही मिळतो. सात वर्षांपासून चालणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुललेला पाहून समाधान मिळतं, असं बाळासाहेब मालुसरे सांगतात.
advertisement
मालुसरे सांगतात, “समाजातील गरजू घटकांना मदत करण्याची भावना या उपक्रमामागे आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी दिवाळी साजरी करतो, तसेच या मुलांसाठीही काहीतरी करायला हवे, हीच प्रेरणा आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी आनंदमय होते आणि त्यांना सणाचा खरा अर्थ कळतो.”
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 03, 2024 5:47 PM IST