Ind Vs Pak: मॉकड्रिल बाबत मोठी अपडेट, पुण्यात फक्त या 3 ठिकाणीचं सायरन वाजणार!

Last Updated:

Ind Vs Pak: महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉकड्रिल आयोजित करण्यात आली असून, पुण्यात मात्र फक्त तीन ठिकाणी हा सराव होणार आहे.

News18
News18
पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे (बुधवार) रोजी नागरी संरक्षण सराव (मॉकड्रिल) घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 16 ठिकाणी मॉकड्रिल आयोजित करण्यात आली असून, पुण्यात मात्र फक्त तीन ठिकाणी हा सराव होणार आहे. याच अनुषंगाने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पत्रकार परिषद घेत कशा पद्धतीने मॉकड्रिल होणार याची माहिती दिली आहे.
तळेगाव नगरपरिषद, मुळशी पंचायत समिती, कौन्सिल हॉल या तीन ठिकाणी होणार आहे. या मॉकड्रिलच्या माध्यमातून सायरन न ऐकू आलेल्यांना कसे मार्गदर्शन करायचे, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी लागणारे साहित्य कसे वापरायचे, लोक अडकले असतील तर मदत कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. विशेषतः नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
advertisement
आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्टवर राहणार असून, जिल्हा प्रशासन आणि सैन्य यांच्यातील समन्वयासाठी खास वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात ब्लॅकआउटची कोणतीही कारवाई होणार नाही. महाविद्यालयांमध्ये सराव होणार नसून काही विद्यार्थी कौन्सिल हॉलला बोलवण्यात येणार आहेत. यामध्ये एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. उद्या केवळ वरील तीन ठिकाणीच सायरन वाजवले जाणार आहेत इतर 75 ठिकाणी सायरन नसेल.
advertisement
मॉकड्रिल दुपारी 4 वाजता सुरू होणार असून, साधारणतः तीन तासाचा कालावधी असला तरी प्रशासनाचे उद्दिष्ट एक तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ind Vs Pak: मॉकड्रिल बाबत मोठी अपडेट, पुण्यात फक्त या 3 ठिकाणीचं सायरन वाजणार!
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement