ऐन दिवाळीत निघणार ‘दिवाळे’, पुणे–दिल्ली प्रवास दुबई, बँकॉकपेक्षा महाग, तिकीट दर पाहिले का?

Last Updated:

Flight Fare: ऐन दिवाळीत विमानाने प्रवास करणाऱ्यांचे दिवाळे निघण्याची चिन्हे आहेत. देशांतर्गत विमानाच्या तिकीट दरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

ऐन दिवाळीत निघणार ‘दिवाळे’, पुणे–दिल्ली प्रवास दुबई, बँकॉकपेक्षा महाग, तिकीट दर पाहिले का?
ऐन दिवाळीत निघणार ‘दिवाळे’, पुणे–दिल्ली प्रवास दुबई, बँकॉकपेक्षा महाग, तिकीट दर पाहिले का?
पुणे: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, देशांतर्गत प्रवास प्रवाशांच्या आवाक्याबाहेर जात आहे. पुण्याहून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर भरमसाठ वाढले आहेत. विशेष म्हणजे, पुण्याहून दुबई किंवा बँकॉकसारख्या देशांचा प्रवास सुमारे 20 हजार रुपयांत शक्य आहे, तर देशांतर्गत प्रवासासाठी तितकेच किंवा त्याहून अधिक तिकीट दर आकारले जात आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांचे मात्र ऐन दिवाळीत ‘दिवाळे’ निघण्याची शक्यता आहे.
दुबई, बँकॉकपेक्षा पुणे ते दिल्लीचा प्रवास महाग
अनेकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक असतात, पण दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या मूळ गावी परततात. यामुळे या काळात प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते आणि तिकिटांचे दरही वाढतात. विमान कंपन्यांच्या दरवाढीचा फटका प्रवाशांना बसत असून, ट्रॅव्हल पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार, पुणे–दिल्ली विमान तिकीट 10 ऑक्टोबरला 10 हजार रुपये होते, तर 18 ऑक्टोबरला ते 15 ते 26 हजार रुपये इतके वाढले आहे.
advertisement
पुणे–बंगळुरू प्रवासासाठी 7 हजार रुपये असलेले तिकीट आता 14 ते 22 हजार रुपये झाले आहे. दरवाढीमुळे प्रवाशांना जवळपास दुप्पट भाडे मोजावे लागत असून, नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गर्दीच्या काळात तिकीट दरावर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांचे आहे.
advertisement
पुण्यातून दररोज दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांची संख्या सर्वाधिक आहे, त्यानंतर बंगळुरूचा क्रमांक लागतो. दिवाळीच्या सणाच्या काळात रेल्वे तिकीट मिळवणे कठीण असल्याने अनेक प्रवासी विमान प्रवासाकडे वळतात. साहजिकच, प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि या संधीचा फायदा घेऊन विमान कंपन्यांनी तिकीट दरात दीडपटाहूनही जास्त वाढ केली आहे. त्याचा थेट फटका प्रवाशांना बसणार आहे. सध्या पुण्यातून दिल्लीसाठी दररोज सरासरी 20 उड्डाणे होत आहेत, तर बंगळुरूला 15 ते 17 उड्डाणे उपलब्ध आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ऐन दिवाळीत निघणार ‘दिवाळे’, पुणे–दिल्ली प्रवास दुबई, बँकॉकपेक्षा महाग, तिकीट दर पाहिले का?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement