मुंबई-पुणे प्रवाशांना दिलासा! नव्या वर्षात सुसाट प्रवासाचे स्वप्न साकार; गेमचेंजर प्लॅनची डेडलाईन ठरली
Last Updated:
Mumbai-Pune Missing link project : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा घाटातील वाहतूक कोंडी कमी होईल. प्रवाशांचा सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
मुंबई : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. सतत लागणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच थोडा तरी आराम मिळणार आहे. कारण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच सुरु होणार असून त्याची तारीखही समोर आलेली आहे.
नव्या वर्षात प्रवाशांसाठी खुशखबर
सध्या लोणावळा-खोपोली परिसरातील घाटमार्गात वाहनांचा वेग कमी होतो. त्यामुळे मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा प्रवास करताना तास ते दीड तास जादा वेळ लागतो. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर उपाय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला.
advertisement
'या' तारखेला होणार सुरु मार्ग
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच 1 मे रोजी हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले आहेत. त्यासोबतच या प्रकल्पातील अत्याधुनिक केबल-स्टेड पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पुलाच्या दोन्ही टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर केवळ प्रवाशांनाच नव्हे तर पुणे शहराच्या विकासालाही फायदा होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 12:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे प्रवाशांना दिलासा! नव्या वर्षात सुसाट प्रवासाचे स्वप्न साकार; गेमचेंजर प्लॅनची डेडलाईन ठरली











