Drone Rules : लग्नात किंवा कार्यक्रमात ड्रोन वापरण्यांसाठी महत्त्वाची बातमी! प्रशासनाने जारी केले नवे निमय
Last Updated:
Drone Rules Weddings Events : लग्न, कार्यक्रम किंवा इतर सोहळ्यात ड्रोन वापरण्यापूर्वी नवीन सरकारी नियम जाणून घ्या. परवानगी, खर्च आणि सुरक्षितता नियम पाळले नाहीत तर दंड आकारला जाऊ शकतो.
पुणे : ड्रोन उडवणे महागात पडणार आहे! लग्न असो वा कोणता कार्यक्रम ड्रोन वापरण्यापूर्वी नागरिकांनी मोठी खबरदारी घेणे अनिवार्य आहे. प्रशासनाने आता जिल्ह्यातील खासगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट आणि फोटोग्राफरसाठी नवे कडक नियम जाहीर केले आहेत. ड्रोन उडवण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यात किमान सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
का लादले नियम?
हे नियम फक्त औपचारिकता नाहीत कारण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था आहेत, जिथून ड्रोनद्वारे टेहळणी होऊन अतिरेकी कारवायांसाठी वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दौंड, बारामती आणि शिरुर तालुक्यात रात्री ड्रोन उडवल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषत वाळू माफियांसारख्या अनैसर्गिक गटांनी ड्रोनद्वारे टेहळणी करून चोरी किंवा अन्य गुन्हा करण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने बंदी लागू केली आहे. आता जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम हवेत उडणाऱ्या सर्व वस्तूंवर कडक बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
कोणती होणार कारवाई?
जर कोणी या आदेशाचा भंग करून ड्रोनद्वारे चित्रीकरण केले, तर कलम 233नुसार कारवाई केली जाईल, जी महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोन वापरल्यास गंभीर गुन्हा समजला जाईल. नागरिकांनी हे नियम गंभीरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर आर्थिक दंड किंवा तुरुंगाची शिक्षा होऊ शकते.
हा निर्णय केवळ सुरक्षा कारणास्तव आहे कारण ड्रोनमुळे टेहळणी, चोरी, दहशतवाद किंवा अन्य गुन्ह्यात उपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न, कार्यक्रम, फोटोशूट किंवा इतर कोणत्याही सोहळ्यात ड्रोन वापरण्यापूर्वी पूर्ण परवानगी आणि नियमांचे पालन अनिवार्य आहे.
advertisement
जिल्ह्यात आता ड्रोनमुक्त क्षेत्रांची यादी जारी केली गेली असून सर्व नागरिकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन उडवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे आणि प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक आदेश घालून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
हा आदेश प्रत्येक नागरिकासाठी शॉकिंग आहे कारण पूर्वी कुठेही अशा कठोर बंदीची कल्पना नव्हती. आता ड्रोन वापरण्यासाठी फक्त मनोरंजन नाही तर परवानगी आणि कायद्याचे पालन आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 11:54 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Drone Rules : लग्नात किंवा कार्यक्रमात ड्रोन वापरण्यांसाठी महत्त्वाची बातमी! प्रशासनाने जारी केले नवे निमय