पोलीसच निघाला 'चोर'; अनेक काळे कारनामे अन् फसवणुकीचे गुन्हे, अखेर पिंपरीत रंगेहाथ पकडलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका ४ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी त्याने संबंधित वकिलामार्फत चक्क २ कोटींची लाच मागितली होती.
पिंपरी-चिंचवड: वर्दीला काळिमा फासणाऱ्या प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) या फौजदाराला शासकीय सेवेतून कायमचं बडतर्फ करण्यात आलं आहे. लाचखोरी आणि कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार हा कठोर निर्णय घेत बडतर्फीचे आदेश जारी केले.
नेमका प्रकार काय?
प्रमोद चिंतामणी जानेवारी २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्त होता. एका ४ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी त्याने संबंधित वकिलामार्फत चक्क २ कोटींची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून २ नोव्हेंबर रोजी त्याला ४६ लाख ५० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. त्याच्या घराच्या झडतीतही घेतली, ज्यात ५१ लाखांचा ऐवज सापडल्याने खळबळ उडाली होती.
advertisement
फसवणुकीचे काळे कारनामे
एसीबीच्या अटकेनंतर या फौजदाराचे अनेक काळे कारनामे उघड झाले. त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे ४० नागरिकांना 'पैसे दुप्पट करून देणे' आणि 'जास्त परतावा देण्याचे' आमिष दाखवून तब्बल ५ कोटी रुपयांना गंडवल्याचे समोर आले. याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला. अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती.
advertisement
चिंतामणी याची वर्तणूक पोलीस खात्याच्या शिस्तीला घातक ठरल्याने, आयुक्तांनी त्याला पोलीस सेवेतून कायमचं बडतर्फ केलं आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पोलीसच निघाला 'चोर'; अनेक काळे कारनामे अन् फसवणुकीचे गुन्हे, अखेर पिंपरीत रंगेहाथ पकडलं


