PMRDA Lottery: पुण्यात घराचं स्वप्न होणार साकार! PMRDA तर्फे बंपर सोडत जाहीर, असा करा ऑनलाईन अर्ज

Last Updated:

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

पुण्यात घराचं स्वप्न होणार साकार!
पुण्यात घराचं स्वप्न होणार साकार!
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. PMRDA ने अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) श्रेणीतील नागरिकांसाठी एकूण ८३३ सदनिकांची मोठी ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, अर्जदाराची नोंदणी, अर्ज भरणे आणि अनामत रकमेचं पेमेंट करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. ज्यामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोडतीअंतर्गत सदनिकांची उपलब्धता दोन मुख्य पेठांमध्ये करण्यात आली आहे. पेठ क्रमांक १२ येथे एकूण ३४० सदनिका उपलब्ध आहेत, ज्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५५ आणि अल्प उत्पन्न गटासाठी २८५ सदनिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पेठ क्रमांक १२ मधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५० लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे, ज्यामुळे घराची किंमत आणखी कमी होईल. उर्वरित ४९३ सदनिका पेठ क्रमांक ३०-३२ येथे उपलब्ध आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०६ आणि अल्प उत्पन्न गटासाठी १८७ सदनिकांचा समावेश आहे.
advertisement
पीएमआरडीए प्रशासनाने अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. ऑनलाईन नोंदणीची सुरुवात आज, सोमवार (१५ डिसेंबर) रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि पेमेंट स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवार (१९ डिसेंबर) दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. अर्जदारांना नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची अंतिम वेळ २७ जानेवारीला रात्री ११.५९ पर्यंत असेल, तर बँक आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
advertisement
सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची प्रारूप यादी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील, तर अंतिम यादी १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्यात येईल आणि याच दिवशी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदार तसेच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे पीएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. तसेच, सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMRDA Lottery: पुण्यात घराचं स्वप्न होणार साकार! PMRDA तर्फे बंपर सोडत जाहीर, असा करा ऑनलाईन अर्ज
Next Article
advertisement
Tejasvee Ghosalkar: 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मनातलं सगळं सांगितलं
'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,
  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

  • 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसालकरांनी मनातलं सगळं सांगितलं,

View All
advertisement