Hinjawadi Traffic Update : हिंजवडी परिसरात अवजड वाहन घेऊन जाताय? प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय आधी वाचा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
हिंजवडीसह परिसरात वाढती अपघातांची संख्या लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेकडून सर्व अवजड वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
पुणे: हिंजवडी भागात अलिकडेच काँक्रिट मिक्सर वाहनाखाली एका दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हिंजवडीसह परिसरात वाढती अपघातांची संख्या लक्षात घेऊन पोलिस यंत्रणेकडून सर्व अवजड वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शहरात येणाऱ्या या वाहनांनी फक्त निर्धारित वेळेतच प्रवास करावा, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे.बांधकाम व्यावसायिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, त्या भागात रहदारीचे नियम काटेकोर पाळले जावेत. तसेच, संबंधित वाहनचालक नशेत नसल्याची खात्री करून, वाहनाची परवाने अद्ययावत असल्याची माहिती विकासकांनी आपल्या प्रकल्पावर नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी कार्यालयात 13 ऑक्टोबरला अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत शहरातील बांधकाम आणि रहदारीसंबंधी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
इतर वाहनचालकांना होतोय अडथळा
view commentsहिंजवडी-मान परिसरातील बांधकाम व्यावसायिकांच्या अवजड वाहने चालू असल्यामुळे इतर वाहनचालकांना अडचणी येत आहेत. या परिस्थितीमुळे रहदारीवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधितांना मार्ग काढण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Hinjawadi Traffic Update : हिंजवडी परिसरात अवजड वाहन घेऊन जाताय? प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय आधी वाचा