Sushil Hagawane : हुंड्याच्या पैशांवर माज! याच वैष्णवीच्या दिराने बैलासमोर ठेवला होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sushil Hagawane Gautami Patil Dance Video : काही दिवसांपूर्वी बैलासमोर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हा कार्यक्रम वैष्णवीच्या दिराने आयोजित केला होता.
Vaishanvi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे हुंडा बळी प्रकरणात फरार आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांना आज पहाटे पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी गेल्या सात दिवसांपासून फरार होते. बावधन परिसरातून आज पहाटे राजेंद्र आणि सुशीलला ताब्यात घेण्यात आलं. अशातच आता सुशील हगवणे याचा एका वर्षापूर्वीचा कांड समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बैलासमोर गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. तो कार्यक्रम आयोजित करणारा दुसरा तिसरा कुणी नसून वैष्णवी हगवणेचा आरोपी दीर सुशील हगवणे आहे.
गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम
मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अशातच आता सुशील हगवणेचा या प्रकरणात कार्यक्रम झाल्याचं बघायला मिळतंय.
advertisement
पाहा Video
गौतमी पाटील कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. कारणही खास आहे. तीचा बैलासमोर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे.#gautamipatil #viral #viralvideo #news18lokmat pic.twitter.com/wMMD653Tox
— News18Lokmat (@News18lokmat) April 28, 2023
advertisement
फोर्च्युनर कार जप्त
वैष्णवीच्या कुटुंबियांकडून त्यांनी हुंडा म्हणून घेतलेली तब्बल 48 लाख रुपये किमतीची फोर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केलीय. व्यतिरिक्त देखील ते पैशाचा नेहमी माज दाखवायचे आणि त्यामुळे ग्रामस्थ देखील त्रस्त होते. एकूणच फुकटच्या पैशावर हागवणे कुटुंबीयांचा माज आता अंगलट आला आहे. पण वैष्णवीच्या दिराचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. याच वैष्णवीच्या दिराने बैलासमोर गौतमीच्या नाच आयोजित केला होता.
advertisement
51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी अन्...
दरम्यान, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेतला होता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 23, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sushil Hagawane : हुंड्याच्या पैशांवर माज! याच वैष्णवीच्या दिराने बैलासमोर ठेवला होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम, पाहा Video