Pune Water Cut: पुणेकर आजपासूनच पाणी साठवून ठेवा, पुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवस पाणीपुरवठ्याचा खोळंबा होणार असल्याने पाणी जपून वापरावं लागेल.
पुणे : पुणेकरांना आजपासूनच पाण्याचा जपून वापर करावा लागेल. महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवारी, 18 डिसेंबर रोजी संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, पाणीपुरवठा यंत्रणेतील काही महत्त्वाच्या स्थापत्य कामांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून व नियोजनबद्ध वापर करावा तसेच महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता लप्कर यांनी केले आहे.
advertisement
या भागात पुरवठा बंद
या पाणीपुरवठा बंदचा परिणाम येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगर (अंशतः), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी, जाधवनगर आदी परिसरांवर होणार आहे. या भागांतील रहिवासी, व्यापारी संस्था तसेच आस्थापनांनी पाणी साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, कामे पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. मात्र, शुक्रवारी सकाळी पाणी येण्यास विलंब होऊ शकतो आणि दाब कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे महापालिकेने सांगितले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 16, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water Cut: पुणेकर आजपासूनच पाणी साठवून ठेवा, पुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?









