बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 6 कामे! अन्यथा घरात आलेली लक्ष्मी जाईल दूर

Last Updated:

Buddha Purnima 2025 : आज वैशाख पौर्णिमा, म्हणजेच बुद्ध पूर्णिमा आहे. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही पवित्र घटना घडल्या. हा दिवस धर्म, अध्यात्म आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

News18
News18
मुंबई : आज वैशाख पौर्णिमा, म्हणजेच बुद्ध पूर्णिमा आहे. या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही पवित्र घटना घडल्या. हा दिवस धर्म, अध्यात्म आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे, काही धार्मिक परंपरांनुसार हा दिवस महालक्ष्मीचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे या दिवशी काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा घरात आलेली शुभ ऊर्जा आणि लक्ष्मीची कृपा परत जाऊ शकते, असे मानले जाते.
1) केस व नखं कापणं टाळा
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी केस किंवा नखं कापू नयेत, असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. विशेषतः महिलांनी या दिवशी केस धुणंही टाळावं. असे केल्यास कुंडलीतील बृहस्पति ग्रह कुपित होतो, ज्यामुळे नकारात्मकता वाढते आणि जीवनात दुर्दैवाचा प्रवेश होतो.हे शारीरिक सौंदर्याच्या पलीकडे जाऊन अध्यात्मिक दोष निर्माण करू शकते.
2) मांसाहार,नशेपासून दूर रहा
या पवित्र दिवशी मांसाहार,मद्यपान किंवा इतर कोणतेही नशेचे सेवन करू नये. शुद्ध सात्विक अन्नच ग्रहण केल्यास पुण्य फळ वाढते. अशा तामसिक वस्तू खाल्ल्यास शरीर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे भविष्यकाळात आरोग्य व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
3) गडद रंगांचे कपडे टाळा
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी काळा, निळा आणि इतर गडद रंगांचे कपडे घालणे टाळा. गडद रंग नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात आणि त्यामुळे घरात मानसिक अशांतता, तणाव आणि वादविवाद होऊ शकतात. याऐवजी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शांतता आणि सकारात्मकता वाढवते.
4) उशिरा झोपून उठू नका
या दिवशी अति झोप किंवा उशिरा उठणं टाळावं, असे शास्त्र सांगते. पौर्णिमेच्या सकाळी लवकर उठून स्नान, ध्यान आणि दान केल्याने अधिक पुण्य मिळते. उशिरा उठल्यास आळस वाढतो, आणि जीवनात सकारात्मक संधी दूर जातात. ईश्वरी कृपा लाभण्यासाठी सकाळी स्नान करून पूजा करणे अनिवार्य आहे.
advertisement
5) पवित्र वृक्षांची तोडणी नको
बुद्ध पूर्णिमेच्या दिवशी तुलसी, पीपळ, बेलपत्र यांचे पानं तोडू नयेत. यामुळे पतीच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो, अशी धारणा आहे. हे वृक्ष पवित्र मानले गेले असून त्यांची छाया, फळं व पानं पूजेसाठी उपयोगात आणली जातात. त्यामुळे त्यांच्या तोडणीने पुण्य कमी आणि पाप वाढते, असे मानले जाते.
6) वाद-विवाद, राग टाळा
या दिवशी घरात राग, वादविवाद किंवा अपशब्द टाळणं गरजेचं आहे. यामुळे घरात नकारात्मक लहरी उत्पन्न होतात, ज्या लक्ष्मीमातेच्या कृपेला अडथळा आणू शकतात. या दिवशी शांतचित्ताने वागणं आणि दानधर्म, जप-तप, ध्यान याकडे कल असणं उत्तम ठरतं.
advertisement
(महत्वाची सूचना - ही बातमी फक्त माहिती करीता आहे. याची न्यूज 18 मराठी पुष्टी करत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 6 कामे! अन्यथा घरात आलेली लक्ष्मी जाईल दूर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement