Vastu Tips : घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग चुकूनही रिकाम्या ठेवू नका 'या' वस्तू; अन्यथा होईल आर्थिक नुकसान!

Last Updated:

वास्तूशास्त्रानुसार, घरात रिकाम्या वस्तू ठेवणं टाळावं. रिकामी भांडी, बादल्या किंवा फुलदाण्या ठेवण्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. विशेषतः स्वयंपाकघरात अशा वस्तू ठेवणं लक्ष्मीचा...

Vastu Tips
Vastu Tips
Vastu Tips : वास्तूशास्त्र हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं शास्त्र आहे. मानवी जीवनातील अनेक नियम वास्तूशास्त्र सांगतं. आपलं घर कसं असावं, हे वास्तूशास्त्र आपल्याला शिकवतं. जर आपण आपलं घर वास्तूशास्त्रानुसार बांधलं आणि सजवलं, तर आपल्या घरात सुख-समृद्धी येते. पण जर घर बांधताना किंवा सजावट करताना काही चूक झाली, तर वास्तू दोष निर्माण होण्याची शक्यता असते.
रिकाम्या गोष्टी ठेवू नयेत, अन्यथा...
वास्तूशास्त्रानुसार, घर हे मानवी जीवनाचा आधार आहे. माणसाच्या आयुष्यातील चढ-उतार, फायदे-तोटे, यश-अपयश हे सर्व काही घरामुळेच ठरतं. वास्तूशास्त्रानुसार, घरात काही गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नयेत. अन्यथा, घरात वास्तू दोष निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे घरात अशांतता आणि अडथळे येतात.
आर्थिक नुकसान अन् मालमत्तेची हानी होते
वास्तूशास्त्रानुसार, ज्योतिषी चंपक शर्मा यांनी सांगितलं की, घरातील पायावर कधीही रिकामी भांडी ठेवू नयेत. यामुळे लोकांच्या आयुष्यात नकारात्मकता येते. बाथरुममध्ये असो किंवा स्वयंपाकघरात, रिकामी बादली कधीही ठेवू नका. यामुळे आर्थिक नुकसान आणि मालमत्तेची हानी होते.
advertisement
या निमयमांचं पालन करा, अडचणी होतील दूर
लोकांनी आपल्या घरात कधीही रिकामी भांडी किंवा फुलदाण्या ठेवू नयेत. हे अपूर्ण नात्याचं प्रतीक आहे. यामुळे वैवाहिक जीवनात अशांतता आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. स्वयंपाकघरात लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही रिकामं भांडं ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि घराचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होतं. वास्तूशास्त्रानुसार, जर या नियमांचं पालन केलं, तर घरात कधीही अशांतता येणार नाही, घरातील अडचणी दूर होतील आणि घरात सुख-समृद्धी येईल.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips : घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग चुकूनही रिकाम्या ठेवू नका 'या' वस्तू; अन्यथा होईल आर्थिक नुकसान!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement