Vastu Tips: घरात आग्नेय दिशेला या वस्तू नकोच! आरोग्य, अनिद्रा, ताण-तणाव सुरूच राहतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips For Aagney Kon: हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. घर बांधण्यापासून ते त्यात ठेवलेल्या साहित्यापर्यंत अनेक नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. आज आग्नेय दिशेविषयी वास्तुशास्त्र जाणून घेऊ.
मुंबई : हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. घर बांधण्यापासून ते त्यात ठेवलेल्या साहित्यापर्यंत अनेक नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. आपण ज्या दिशेला काही ठेवता त्या दिशेपासून तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मिळते. घरात ठेवलेल्या वस्तूंचाही आपल्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, असे मानले जाते. सामान्यतः लोकांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण दिशांची माहिती असते. पण याशिवाय ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य अशा चार दिशाही आहेत. आज आपण ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून आग्नेय कोनाविषयी जाणून घेणार आहोत.
आग्नेय दिशा?
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधली जागा ही आग्नेय कोन (आग्नेय दिशा) म्हणतात. ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. कारण या दिशेवर सूर्यकिरणांचे वर्चस्व सर्वाधिक असते. त्यामुळे या दिशेला कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच केली जाते. विशेषत: इलेक्ट्रिक आणि ज्वलनशील वस्तू येथे ठेवल्या जात नाहीत. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात, असे मानले जाते.
advertisement
बेडरूम नको -
वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला बेडरूम बनवू नये, कारण ही दिशा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि अशा स्थितीत या दिशेला बेडरूम ठेवल्याने तुम्हाला अस्वस्थता, निद्रानाश आणि तणावासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते.
advertisement
पाण्याशी संबंधित गोष्टी -
आग्नेय कोपऱ्यात पाण्याशी संबंधित वस्तूही ठेवू नये, कारण पाणी आणि अग्नि हे एकमेकांच्या विरुद्ध तत्व आहेत. येथे बोअरिंग, हातपंप, पाण्याची टाकी किंवा नळ बसवू नये. असे केल्यास आपल्याला नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2024 5:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: घरात आग्नेय दिशेला या वस्तू नकोच! आरोग्य, अनिद्रा, ताण-तणाव सुरूच राहतात