ज्येष्ठ पौर्णिमेला खास शुभ योग; या तीन राशींना मिळणार शुभ फळं: करिअरमध्ये होणार प्रगती, धनलाभाचे योग
- Published by:Prachi Dhole
- trending desk
Last Updated:
22 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. या दिवशी ग्रहांमुळे काही खास शुभ योग तयार होत आहेत. हे योग प्रामुख्याने तीन राशींसाठी शुभ फलदायी ठरतील. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या
प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करतो. ग्रहाने राशिपरिवर्तन केलं की त्याचे अन्य ग्रहांशी योग तयार होतात. या योगामुळे राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळ मिळतं. हे विशिष्ट योग खास तिथीला झाले तर त्यांचं महत्त्व अधिकच वाढतं. 22 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. या दिवशी ग्रहांमुळे काही खास शुभ योग तयार होत आहेत. हे योग प्रामुख्याने तीन राशींसाठी शुभ फलदायी ठरतील. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या.
22 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. या वेळी पौर्णिमा तिथी दोन दिवस असेल. 21 जूनला पौर्णिमा सुरू होत असून, 22 जूनला सकाळी ही तिथी संपेल. ज्येष्ठ पौर्णिमा शुक्ल योगावर होत आहे. या दिवशी इतर शुभ योगांसह बुधादित्य, शुक्रादित्य योग होत आहे. हे योग वृषभ, कर्क आणि धनू राशीसाठी शुभ फलदायी असतील. या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल.
advertisement
वृषभ : ज्येष्ठ पौर्णिमा या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. त्यांना लाभ मिळेल. समस्या दूर होतील. या व्यक्तींना नवीन ऊर्जा मिळेल. मनात सकारात्मक विचार येतील. चांगलं काम कराल आणि त्यात यशदेखील मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरमध्ये प्रमोशन, प्रगतीचे योग आहेत.
कर्क : या राशीच्या व्यक्तींचा सुवर्णकाळ ज्येष्ठ पौर्णिमेपासून सुरू होत आहे. तुम्हाला लाभ मिळेल. नोकरी, व्यवसायात चांगले रिझल्ट मिळतील. परदेश प्रवासाचे योग आहेत. देशांतर्गत लांबचा प्रवास कराल. पैशांची आवक वाढेल. एकापेक्षा जास्त स्रोतांमधून पैसा मिळेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक जीवन चांगलं राहील.
advertisement
धनू : या राशीच्या व्यक्तींना ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची कृपादृष्टी लाभेल. रखडलेली कामं वेगात पूर्ण होतील. कामात यश मिळाल्याने तुम्ही आनंदी आणि उत्साही असाल. लव्ह लाइफमध्ये प्रेम वाढेल. विवाहित व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे. जोडीदाराशी नातं अधिक घट्ट होईल. चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2024 10:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
ज्येष्ठ पौर्णिमेला खास शुभ योग; या तीन राशींना मिळणार शुभ फळं: करिअरमध्ये होणार प्रगती, धनलाभाचे योग