Vastu Tips: दारावर घोड्याची उलटी नाल का लावली जाते? इतक्या गोष्टींवर परिणाम, वास्तुशास्त्र काय सांगतं

Last Updated:

Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालीच्या वापराचे विविध फायदे सांगितले आहेत. आयुष्यात अनेक समस्या येत असतील, तर वास्तुशास्त्रातील नियमानुसार घोड्याची नाल वापरल्यास अडचणी दूर होतात, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई : समाजात अनेक रुढी-परंपरा प्रचलित आहेत, ज्याला अनेकजण अंधश्रद्धा मानतात. दारावर घोड्याची नाल लावल्याचे आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल. दाराला घोड्याची उलटी नाल ठोकलेली अनेक ठिकाणी दिसून येते. पण असं का करतात? यामागे नेमकं कारण काय आहे? हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालीच्या वापराचे विविध फायदे सांगितले आहेत. आयुष्यात अनेक समस्या येत असतील, तर वास्तुशास्त्रातील नियमानुसार घोड्याची नाल वापरल्यास अडचणी दूर होतात, असे मानले जाते.
वास्तुदोषामुळे एखाद्या व्यक्तीला सतत अडचणी येऊ शकतात. पण घोड्याच्या नालीच्या नियमांचं पालन करून आपण जीवनातील अडचणींपासून मुक्त होऊ शकता. वास्तुशास्त्रात घोड्याची नाल अतिशय शुभ मानली जाते. ती योग्य पद्धतीनं वापरल्यास आर्थिक संकटासारखी मोठी समस्याही दूर होते. घोड्याची नाल कशा पद्धतीने वापरायची जाणून घेऊ.
शनिदोष दूर करण्यासाठी -
कुंडलीत शनिदोष असल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर घराबाहेर घोड्याची नाल नक्कीच बसवा. त्यामुळे न्यायदेवता शनिदेव तुमच्यावर कृपा करतील, आणि प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील संकटे दूर करतील. कुंडलीतील शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरेल.
advertisement
घरामध्ये नकारात्मकता असेल तर?
तुमच्या घरामध्ये नकारात्मकता वाढू लागली असेल, सतत घरामध्ये वाद होत असतील, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल बसवा. यामुळे घरात सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील.
असं करा आर्थिक संकट दूर
तुम्ही जर आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तुम्हाला आर्थिक दृष्टिनं यश मिळत नसेल, तर तुम्ही घोड्याची नाल लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा तुम्ही घरामध्ये पैसे ज्या ठिकाणी ठेवता, त्याठिकाणी ठेवा. असं केल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहिल.
advertisement
करिअरमध्ये मिळेल यश
कठोर परिश्रम केल्यानंतरही तुम्हाला करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर तुम्ही शनिवारी मधल्या बोटात घोड्याच्या नालीपासून बनवलेली अंगठी घालावी. काही दिवसामध्येच तुम्हाला त्याचे फायदे दिसून येतील, व तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल.
दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल घरात ठेवल्यानं सुख-शांती तर मिळतेच पण पैशांची कमतरताही दूर होते. पण अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. खरतर वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, जे तुमच्या वास्तुचा दोष दूर करू शकतात. अर्थात त्यावर कितीपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: दारावर घोड्याची उलटी नाल का लावली जाते? इतक्या गोष्टींवर परिणाम, वास्तुशास्त्र काय सांगतं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement