Vat Purnima 2025: वटपौर्णिमेला शुभ मुहूर्त चुकवू नका! व्रत आणि पूजा विधीची संपूर्ण माहिती

Last Updated:

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. वटपौर्णिमचा मुहूर्त, व्रत आणि पूजा विधीबाबत जाणून घेऊ.

+
Vat

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेला शुभ मुहूर्त चुकवू नका! व्रत आणि पूजा विधीची संपूर्ण माहिती

पुणे: हिंदू धर्मातील एक पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा सण म्हणजे वट पौर्णिमा. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. पुराणकथेनुसार, याच दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत पाळतात.
वट पौर्णिमा 2025: तारीख आणि तिथी
तारीख: 10 जून 2025 (मंगळवार)
पौर्णिमा तिथी सुरू: सकाळी 11:35 (10 जून)
पौर्णिमा तिथी समाप्त: 11 जून दुपारी 1:13
 शुभ मुहूर्त
पूजेचा उत्तम काळ: सकाळी 11:55 ते दुपारी 12:51
सर्वोत्तम वेळ: सूर्योदयापासून दुपारपर्यंत
advertisement
वट सावित्री व्रताचे महत्त्व
वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचा वास असल्याचे धार्मिक मान्यतेत म्हटले आहे. स्त्रिया वटवृक्षाभोवती कच्च्या सूताने सात प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करतात. सावित्री-सत्यवानाची कथा या सणाच्या मागील प्रेरणा आहे. त्यामुळे हा सण पत्नीच्या निष्ठा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
advertisement
 व्रत कसे करावे?
  1. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि लाल किंवा पिवळ्या कपड्यांत पूजा करण्याचा संकल्प घ्या.
2. 16 श्रुंगार करून वटवृक्षाजवळ पूजेसाठी सज्ज व्हा.
3. पूजा साहित्यात फुले, अक्षता, मिठाई, आंबा, फणस, जांभूळ, हळद-कुंकू इत्यादी ठेवा.
4. वडाच्या झाडाला पाणी घाला, रक्षासूत्र बांधा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला.
advertisement
5. पतीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करा.
6. विवाहित महिलांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या.
वट सावित्री व्रताचे नियम
सोळा अलंकार परिधान करावेत.
व्रत पूर्ण झाल्यावर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
फळे, कपडे, धान्य यांचा दान करावा गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणाला.
पौराणिक महत्त्व
वडाच्या झाडाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव असतात, असा विश्वास आहे. झाडाच्या पारंब्या म्हणजे सावित्रीचे रूप मानले जाते. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने दैवी कृपा आणि सौभाग्य लाभते, असे ज्योतिषी राजेश जोशी सांगतात
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेला शुभ मुहूर्त चुकवू नका! व्रत आणि पूजा विधीची संपूर्ण माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement