Temple Bell Rule : मंदिरात घंटा वाजवण्याचा नियम माहितीयत का? दर्शन घेताना की घेतल्यानंतर केव्हा वाजवावी घंटा?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
धार्मिक दृष्टिकोनातून पाहता, मंदिरातील घंटा वाजवण्यासंबंधी काही विशिष्ट नियम आहेत, जे अनेकांना आजही माहित नाही.
मुंबई : मंदिरांमध्ये आपण भक्तगण एक गोष्ट आवर्जून करतात. ते म्हणजे देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना ते घंटा वाजवतात. तर काही लोक गाभाऱ्याबाहेर पडल्यानंतर घंटा वाजवतात. लोक आपली श्रद्धा किंवा मान्यतेनुसार ही घंटा वाजवतात खरी पण तुम्हाला माहिती आहे का की मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवणे योग्य मानलं जात नाही?
होय, हे खरे आहे! धार्मिक दृष्टिकोनातून पाहता, मंदिरातील घंटा वाजवण्यासंबंधी काही विशिष्ट नियम आहेत, जे अनेकांना आजही माहित नाही.
हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार, मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवणे अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की मंदिरात घंटा वाजवली की, देव-देवतांचे चैतन्य जागृत होते. त्याचबरोबर, घंटेच्या नादामुळे मंदिराचा परिसरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) भरून जातो. मन एकाग्र होतं, वातावरणातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या मनात भक्तीची भावना अधिक गडद होते.
advertisement
असे मानले जाते की मंदिरात देवतेच्या सान्निध्यात तयार झालेली सकारात्मक ऊर्जा आपल्या आत साठलेली असते. जर आपण बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवली, तर ती ऊर्जा बाहेर पसरते आणि आपल्यामधील ती शक्ती नष्ट होते.
हे देखील म्हटले जाते की मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवल्यास, देव नाराज होतात. म्हणूनच, देवदर्शनानंतर शांतपणे मंदिराच्या बाहेर पडावे आणि आपल्या मनातल्या श्रद्धेचे स्मरण ठेवावे.
advertisement
म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, तेव्हा प्रवेश करताना नक्कीच घंटा वाजवा, पण बाहेर पडताना ती वाजवण्याचे टाळा. या लहानशा नियमाचे पालन केल्याने तुम्ही तुमच्यात साठलेली आध्यात्मिक ऊर्जा टिकवू शकाल.
ही माहिती केवळ धार्मिक विश्वासावर आधारित असली तरी, पारंपरिक शास्त्रांमध्ये अशा नियमांचे पालन केल्याने मानसिक शांती आणि श्रद्धा अधिक दृढ होते.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 7:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Temple Bell Rule : मंदिरात घंटा वाजवण्याचा नियम माहितीयत का? दर्शन घेताना की घेतल्यानंतर केव्हा वाजवावी घंटा?