Gauri puja: आली गवर आली! गणपती आणि गौरीचं नातं काय? घरी गौरी आवाहन या वेळापर्यंतच करा

Last Updated:

Ganesh Chaturthi 2024: गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते, असे मानले जाते. गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेऊन माघारी निघते.

News18
News18
मुंबई : गौरी-गणपतीच्या सण अबाल-वृद्ध सर्वांसाठीच आनंदाचा असतो. दहा दिवस सर्वत्र उत्साहाचे, भक्तीमय वातावरण असतं. खायला गोड-धोड पदार्थ मिळतात. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर पाठोपाठ घरी गौरी येतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच घरोघरी आगमन होतं, या गौरी आवाहन असं म्हणतात. गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. गौरीच्या रुपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते, असे मानले जाते. गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेऊन माघारी निघते.
उद्या मंगळवार 10 सप्टेंबर रोजी गौरी घरी येणार आहेत. घरी गौरी आवाहन रात्री 08.02 वाजण्यापूर्वी करून घ्यावे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झाल्यावर. दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना जेष्ठागौरी असं म्हणतात. प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. सोबत घरगुती गणपतींचही विसर्जन होतं.
advertisement
गौरी आणि गणपतीचं नातं काय? काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात.
advertisement
महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं. त्यांना तुळशी वृंदावना जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलं जातं. गौरी येण्याच्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्या दिवशी महाप्रसाद केला जातो.
advertisement
या दिवशी 16 भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ केले जातात. तर, याच दिवशी काही ठिकाणी ववसा घेण्याची पद्धत असते. शिवाय लाडू, चकल्या, करंजी असे विविध प्रकारचे फराळ, फळं यांचाही गौरी-गणपतीला नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gauri puja: आली गवर आली! गणपती आणि गौरीचं नातं काय? घरी गौरी आवाहन या वेळापर्यंतच करा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement