IND vs WI : 24 कॅमेरांसमोर पार्टनरच्या सटासट कानाखाली मारल्या, भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राड्याचा Live Video

Last Updated:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी मैदानात राडा पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये बसलेल्या महिलेने त्याच्या पार्टनरला सटासट कानाखाली मारल्या आहेत.

24 कॅमेरांसमोर पार्टनरच्या सटासट कानाखाली मारल्या, भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राड्याचा Live Video
24 कॅमेरांसमोर पार्टनरच्या सटासट कानाखाली मारल्या, भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राड्याचा Live Video
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या पदरी निराशा आली. शक्य असूनही टीम इंडियाला हा सामना चौथ्या दिवशी जिंकता आला नाही, त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना पुन्हा पाचव्या दिवशीही मैदानात उतरावं लागणार आहे. चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये अशी काही घटना घडली, ज्याचा विचार चाहत्यांनी कधी केलाही नसेल. लाईव्ह सामन्यादरम्यान तरुण तरुणीला प्रपोज करताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल, पण भारत-वेस्ट इंडिज सामन्यात तरुणी त्याच्या पार्टनरची धुलाई करताना दिसली.

कॅमेरामध्ये दिसली हाणामारी

वेस्ट इंडिजच्या टीमची बॅटिंग सुरू असताना ही घटना घडली. वेस्ट इंडिजच्या टीमने 4 विकेट गमावून 234 रन केल्या होत्या, त्यामुळे त्यांची आघाडी 23 रनपर्यंत पोहोचली होती. तेव्हाच कॅमेरामनने प्रेक्षकांच्या दिशेने कॅमेरा फिरवला, तेव्हा टीव्हीवर महिला त्याच्या पार्टनरच्या कानशिलात लगावत असल्याचं दिसलं. लाल रंगाचे कपडे आणि गॉगल लावलेली या महिलेने स्टेडियममध्येच तिच्या पार्टनरवर हात उचलला. महिलेने एक-दोनदा नाही तर अनेकदा तरुणावर हात उचलला. दोघांच्या चेहऱ्याकडे बघून हे भांडण फार गंभीर नसून महिलेने मजेमध्ये तरुणावर हात उचलल्याचं वाटत आहे.
advertisement

भारताला 121 रनचं आव्हान

वेस्ट इंडिजचा दुसऱ्या इनिंगमध्ये 390 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताला विजयासाठी 121 रनचं आव्हान मिळालं. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 विकेट गमावून 63 रन केले होते. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 518/5 वर डाव घोषित केला, त्यानंतर वेस्ट इंडिजचा 248 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला.
advertisement

पाचव्या दिवशी लागणार मॅचचा निकाल

जॉन कॅम्पबेल (115 रन) आणि शाय होप (103 रन) यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 177 रनची पार्टनरशीप झाली, त्यानंतर जस्टिन ग्रीव्हसने नाबाद 50 आणि जेडेन सिल्सने 32 रन केल्या, या दोघांमध्ये शेवटच्या विकेटसाठी 79 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे हा सामना पाचव्या दिवशी गेला. याआधी अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा इनिंग आणि 140 रननी विजय झाला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : 24 कॅमेरांसमोर पार्टनरच्या सटासट कानाखाली मारल्या, भारत-वेस्ट इंडिज सामन्यात राड्याचा Live Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement