ऑस्ट्रेलियाची वाघीण जबरदस्त खेळली, भारताकडूनही खतरनाक निरोप, जमिनीतून खोदून काढली विकेट

Last Updated:

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिलीने भारताविरूद्ध सामन्यात एकाकी झूंज दिली. कारण तिने एकटीने 142 धावांची शतकीय खेळी केली होती. ही खेळी पाहता ती ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देईल असे वाटत होते.

sneh rana takes brilliant catch of alyssa healy
sneh rana takes brilliant catch of alyssa healy
IND w vs AUS W : ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिलीने भारताविरूद्ध सामन्यात एकाकी झूंज दिली. कारण तिने एकटीने 142 धावांची शतकीय खेळी केली होती. ही खेळी पाहता ती ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देईल असे वाटत होते. पण या दरम्यान ती आऊट झाली होती.ती जितक्या जबरदस्त खेळली तितक्या जबरदस्त आऊट झाली होती.त्यामुळे भारताने तिला जबरदस्त निरोप दिला होता.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलियाची एलिसा हिलीने 142 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान तिने 3 षटकार आणि 21 चौकार लगावले होते. एलिसा हिली ज्या लयीत खेळत होती ते पाहता ती ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊन श्वास घेईल असे वाटत होते. पण या दरम्यान श्री चरणीच्या बॉलवर ती फसली आणि आऊट होऊन बसली.
advertisement
एलिसा हिलीने श्री चरणीच्या बॉलवर खेळत असताना तिचा बॅटीला कड लागला आणि बॉल थेट बँकवर्ड पॉईंटवर गेला होता.यावेळी तिथे उभ्या असलेल्या स्नेह राणाने एका हाताने जमीनीत खोदून कॅच घेतली. अशाप्रकारे स्नेह राणाने एका जबरदस्त खेळाडूची कॅच घेऊन तिला खतरनाक निरोप दिला आहे. 
advertisement
सध्या ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 305 धावा ठोकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे.
भारताचा डाव 
टीम इंडिया प्रथम फलंदाजी करताना 330 धावांवर ऑल आऊट झाली होती. टीम इंडियाकडून स्मृती मांनधना आणि प्रतिका रावलने चांगली सूरूवात केली होती. दोघींनी मिळून 155 धावांची पार्टनरशीप केली होती. स्मृती मंधानाने 80 धावांची अर्ध शतकीय खेळी केली होती. या खेळीत तिने 3 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. स्मृतीनंतर प्रतिका रावलने 75 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या दरम्यान तिने 1 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.
advertisement
या दोन्ही खेळाडूनंतक मिडर ऑर्डर सपशेल फेल ठरला होता.कारण हरलीन देओलने 38 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 धावा, जेमीमा रॉड्रीक्सने 33 धावा, रिचा घोषने 32 धावा, अमनज्योत कौरने 16 धावा केल्या होत्या.बाकी इतर खेळाडू एकेरी धावा करून बाद झाले. अशाप्रकारे भारताचा डाव 48.5 ओव्हरमध्ये 330 धावांवर ऑलआऊट झाला होता.ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सुथरलँडने 5 विकेट घेतल्या होत्या. तर सोफीने 3 आणि मेगन स्कट आणि अॅश्ले गार्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऑस्ट्रेलियाची वाघीण जबरदस्त खेळली, भारताकडूनही खतरनाक निरोप, जमिनीतून खोदून काढली विकेट
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement