दुबईनंतर आता लाहोरमध्ये घुसून मारलं, भारतीय क्रिकेटरचा पाकिस्तानमध्ये धमाका, काही समजायच्या आतच ऑलआऊट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 378 रनवर ऑलआऊट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर सेनुरन मुथुसामीने पाकिस्तानच्या अर्ध्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या.
लाहोर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 378 रनवर ऑलआऊट झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर सेनुरन मुथुसामीने पाकिस्तानच्या अर्ध्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. 117 रन देऊन मुथुसामीने 6 विकेट मिळवल्या, ही त्याची टेस्ट क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मुथुसामीने 4 बॉलमध्ये पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा स्पिनर मुथुसामीने एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यामुळे पाकिस्तानची अवस्था 362-5 वरून 362-8 अशी झाली. 9 ओव्हरनंतर सलामन आघा 93 रनवर आऊट झाला, यानंतर पाकिस्तानचा डाव 378 रनवर संपुष्टात आला, म्हणजेच पाकिस्तानने 16 रनवरच शेवटच्या 5 विकेट गमावल्या. पाकिस्तानचा ओपनर इमाम-उल-हकही पहिल्या दिवशी 93 रनवरच आऊट झाला होता. इमाम-उल-हकने कर्णधार शान मसूदसोबत (76 रन) 161 रनची पार्टनरशीप केली.
advertisement
पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाची सुरूवात 313 रनवर केली होती, तेव्हा मोहम्मद रिझवान 75 रनवर खेळत होता. रिझवान आणि आगा यांच्यात 163 रनची पार्टनरशीप झाली. याचसोबत पाकिस्तानने सहाव्या विकेटसाठी टेस्ट क्रिकेटमधली त्यांची सर्वोत्तम पार्टनरशीप केली. मुथुसामीनेने मग नोमानला बोल्ड केलं आणि त्यानंतर साजिद खानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, यामुळे मुथुसामी सामन्यात दुसऱ्यांदा हॅट्रिकवर होता, पण सलमान आघाने त्याला हॅट्रिकपासून रोखलं. मुथुसामीशिवाय सुबरायनने 2 विकेट घेतल्या तर रबाडा आणि हार्मरला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
कोण आहे सेनुरन मुथुसामी?
सेनुरन मुथुसामी भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकन खेळाडू आहे. मुथुसामीचे आई-वडील मूळचे तामीळनाडूचे आहेत, पण त्याचं कुटुंब डरबनमध्ये स्थायीक झालं. सेनुरनचा जन्म भारतामध्येच झाला आहे. सेनुरन 11 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं, यानंतर आईनेच सेनुरनला लहानाचं मोठं केलं आणि त्याला क्रिकेटर बनवलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दुबईनंतर आता लाहोरमध्ये घुसून मारलं, भारतीय क्रिकेटरचा पाकिस्तानमध्ये धमाका, काही समजायच्या आतच ऑलआऊट!