IPL संपताच फटाके फुटले, हार्दिक-अय्यरनंतर आणखी एक 'कॅप्टन' टीमची साथ सोडणार!

Last Updated:

आयपीएल 2025 संपून अजून आठवडा संपला नाही तोच फटाके फुटायला सुरूवात झाली आहे.

IPL संपताच फटाके फुटले, हार्दिक-अय्यरनंतर आणखी एक 'कॅप्टन' टीमची साथ सोडणार!
IPL संपताच फटाके फुटले, हार्दिक-अय्यरनंतर आणखी एक 'कॅप्टन' टीमची साथ सोडणार!
मुंबई : आयपीएल 2025 संपून अजून आठवडा संपला नाही तोच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन टीमची साथ सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संजू दुखापतीमुळे सुरूवातीचे काही सामने इम्पॅक्ट सब म्हणून खेळला, तर काही सामने तो खेळू शकला नाही. संजू सॅमसनच्या गैरहजेरीमध्ये रियान परागने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं. संजू सॅमसनने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे तो राजस्थानची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
संजू सॅमसनने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, यात तो रस्ता क्रॉस करत आहे. पुढे जायची वेळ आली आहे, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. संजूच्या या फोटोवर तो राजस्थानची साथ सोडणार असल्याच्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संजू सॅमसन 9 सामने खेळला, यात त्याने 140.39 च्या स्ट्राईक रेटने आणि 35.63 च्या सरासरीने 285 रन केले. राजस्थान रॉयल्सची यंदाच्या हंगामातली कामगिरी निराशाजनक झाली. 14 सामन्यांमध्ये राजस्थानला फक्त 4 विजय मिळवता आले, तर 10 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान नवव्या क्रमांकावर राहिली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातले घरच्या मैदानातले पहिले दोन सामने राजस्थान गुवाहाटीमध्ये खेळली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Sanju V Samson (@imsanjusamson)



advertisement

आयपीएलवेळीच वादाचं वृत्त

दरम्यान आयपीएल सुरू असतानाच संजू सॅमसन नाराज असल्याची वृत्तं आली होती. सूत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार संजू काही खेळाडूंच्या टीममध्ये सतत समावेश करण्याच्या आणि टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीविरोधात होता, तेव्हापासूनच संजू राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं गेलं.

संजूचं करिअर

2021 साली संजू सॅमसनला राजस्थानचं कर्णधार केलं गेलं, यानंतर त्याने 14 इनिंगमध्ये 484 रन केले. 2022 मध्येही संजूने टीमचं उत्कृष्ट नेतृत्व केलं, ज्यामुळे राजस्थान आयपीएल फायनलमध्ये पोहोचली. 2022 मध्ये संजूने 28.62 च्या सरासरीने 458 रन तर 2023 मध्ये 362 रन केले. आयपीएल 2024 मध्ये संजूच्या बॅटमधून 531 रन आले, ज्यामुळे राजस्थानची टीम आणखी एका प्ले-ऑफमध्ये पोहोचली, पण आयपीएल 2025 मध्ये संजू दुखापतीमुळे फार खेळू शकला नाही, याचा फटका राजस्थान रॉयल्सलाही बसला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL संपताच फटाके फुटले, हार्दिक-अय्यरनंतर आणखी एक 'कॅप्टन' टीमची साथ सोडणार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement