IPL संपताच CSK च्या गळाला मोठा मासा; धोनीची रिप्लेसमेंट मिळाली, कीपिंग-कॅप्टन्सीचंही टेन्शन मिटलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 चा मोसम संपून अजून एक आठवडाही झालेला नाही. आयपीएलच्या 18 वर्षांमध्ये आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन झाली आहे, तर आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
मुंबई : आयपीएल 2025 चा मोसम संपून अजून एक आठवडाही झालेला नाही. आयपीएलच्या 18 वर्षांमध्ये आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन झाली आहे, तर आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सीएसकेला या मोसमात 14 पैकी फक्त 4 मॅच जिंकता आल्या तर 8 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर राहिली.
आयपीएलच्या पुढच्या मोसमात धोनी खेळणार का नाही? याबाबत साशंकता असतानाच सीएसकेच्या चाहत्यांनी आताच धोनीची रिप्लेसमेंट शोधली आहे. याला कारण ठरलं आहे ते संजू सॅमसनने केलेली एक इन्स्टाग्राम पोस्ट. संजूने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संजू पत्नीसोबत रस्ता क्रॉस करत आहे, पुढे जायची वेळ आली आहे, असं कॅप्शन संजूने त्याच्या या फोटोला दिलं आहे.
advertisement
संजूच्या या कॅप्शनमुळे तो राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असल्याच्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात संजू दुखापतीमुळे फक्त 14 पैकी फक्त 9 सामने खेळू शकला, यातल्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये तो इम्पॅक्ट सब म्हणून खेळला, त्यामुळे रियान पराग राजस्थानचा कर्णधार होता. आयपीएल सुरू असतानाच संजू नाराज असल्याचं वृत्तही समोर आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार संजू काही खेळाडूंच्या टीममध्ये सतत समावेश करण्याच्या आणि टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीविरोधात होता, तेव्हापासूनच संजू राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं गेलं.
advertisement
advertisement
सीएसकेकडे जाणार संजू?
संजू सॅमसन खरंच राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असेल तर तो सीएसकेकडे जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोनीने निवृत्ती घेतली तर राजस्थानला नव्या विकेट कीपरची गरज आहे, तसंच संजू सॅमसनकडे कॅप्टन्सीचाही अनुभव आहे, त्यामुळे चाहते संजू सीएसकेकडे येईल, असं भाकीत वर्तवत आहेत.
केकेआरही रेसमध्ये
advertisement
राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनची साथ सोडली तर केकेआरही या रेसमध्ये येईल, कारण त्यांनाही विकेट कीपर आणि कॅप्टनची गरज आहे. केकेआरने या मोसमात क्विंटन डिकॉक आणि रहमतुल्लाह गुरबाज या दोन विकेट कीपरना संधी दिली, पण दोघंही अपयशी ठरले. तसंच केकेआरने अजिंक्य रहाणेला शेवटच्या क्षणी कर्णधार केलं, त्यामुळे संजूला टीममध्ये घेतलं तर केकेआरचं कॅप्टन आणि विकेट कीपरचंही टेन्शन मिटेल.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
June 09, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL संपताच CSK च्या गळाला मोठा मासा; धोनीची रिप्लेसमेंट मिळाली, कीपिंग-कॅप्टन्सीचंही टेन्शन मिटलं!