'ऋषभ मैदानात वेदनेने विव्हळत होता...', KL Rahul ने सांगितली पंतची झुंजार स्टोरी, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
KL Rahul On Rishabh Pant struggle story : ऋषभ पंतला बॅट पकडतानाही खूप त्रास होत होता. अनेकदा चेंडू त्याच्या दुखापतग्रस्त भागाला लागल्याने त्याच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या.
Rishabh Pant Injuy struggle Batting : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) दुखापतीतूनही दाखवलेला संयम आणि झुंजारवृत्ती नक्कीच कौतुकास पात्र असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी विकेटकीपिंग करताना ऋषभला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो विकेटकीपिंग करू शकला नाही. त्याची जागा ध्रुव जुरेलने घेतली होती. पंत फलंदाजीला येणार की नाही, या चिंतेत असलेल्या चाहत्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला मैदानात उतरताना पाहताच सुटकेचा निश्वास टाकला. पण ऋषभसाठी मैदानात उतरणं एवढं सोपं नव्हतं.
राहुलने दिली ऋषभच्या वेडेपणाची साक्ष
वेदनादायी परिस्थितीतही पंतने 74 धावांची एक अविस्मरणीय आणि महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे भारताला 387 धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. त्याच्या खेळीदरम्यान, त्याला अनेकदा वेदना होत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. तरीही तो संघासाठी क्रीझवर पाय रोवून उभा राहिला. मैदानात त्याला साथ देत असलेल्या केएल राहुलने ऋषभच्या वेडेपणाची साक्ष दिली.
advertisement
ऋषभला वेदना सहन होत नव्हत्या...
ऋषभ पंतला बॅट पकडतानाही खूप त्रास होत होता. अनेकदा चेंडू त्याच्या दुखापतग्रस्त भागाला लागल्याने त्याच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या. या सर्व अडचणी असूनही, पंतने आपल्या खेळात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत अनेक जोरदार शॉट्स मारले. ऋषभ ग्लब्ज घातलाना देखील त्रास होत होता. मात्र, त्याने त्या वेदना सहन केल्या आणि मैदानात टिकून राहिला. एखाला बाऊंसर आला किंवा फास्ट बॉल आला तर ऋषभला खेळणं अवघड जात होतं, असं केएल राहुलने सांगितलं.
advertisement
ग्लोव्हजवरही दुखापत
दरम्यान, पंत मला वारंवार सांगत होता की दुखापतीमुळे त्याला अनेक असे चेंडू सोडावे लागत आहेत, जे तो सहजपणे बाउंड्रीच्या बाहेर पाठवू शकला असता. बॅट पकडताना त्याला खूप वेदना होत होत्या. जेव्हा चेंडू तुमच्या बॅटला लागतो, तेव्हा खूप घर्षण (फ्रिक्शन) होते. त्याला काही वेळा ग्लोव्हजवरही दुखापत झाली, जे योग्य नव्हते. तो खूप वेदनेत होता, असं केएल राहुल म्हणतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'ऋषभ मैदानात वेदनेने विव्हळत होता...', KL Rahul ने सांगितली पंतची झुंजार स्टोरी, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !