IND vs ENG 3rd Test : नेमकी चूक कुणाची? Rahul की Rishabh? KL ने सांगितलं, गडबड कुठं झाली?

Last Updated:

KL Rahul On Rishabh Pant run out : इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बाशिर गोलंदाजी करत असताना, पंतने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि मोठी गडबड झाली. त्यावर केएल राहुलने पत्रकार परिषदेत खुलासा केला.

KL Rahul On Rishabh Pant run out
KL Rahul On Rishabh Pant run out
Ind vs Eng 3rd test : लॉर्ड्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यातील 141 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सवर संपुष्टात आली. दुपारच्या जेवणापूर्वी (Lunch Time) ऋषभ पंत धावबाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला होता. केएल राहुल 98 धावांवर खेळत असताना, शेवटच्या ओव्हरमध्ये शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होता. इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बाशिर गोलंदाजी करत असताना, पंतने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि मोठी गडबड झाली.

एक चूक अन् ऋषभची विकेट गेली

जेणेकरून राहुलला स्ट्राईक मिळेल आणि तो आपले शतक पूर्ण करू शकेल. मात्र, या प्रयत्नात ऋषभ पंत धावबाद झाला. बेन स्टोक्सने कव्हरवरून बॉल पकडून थेट स्टंप्सवर मारत ऋषभ पंतला शॉर्ट ऑफ क्रीझ पकडलं आणि बिचारा पंत 74 धावांवर बाद झाला. त्यानंतर पत्रकार परिषदेत केएल राहुलने (KL Rahul On Rishabh Pant run out) खुलासा केला आहे.
advertisement

काय म्हणाला KL Rahul?

ऋषभ पंत ज्या पद्धतीने आऊट झाला, ते खरोखर वाईट होतं. रनआऊट झाल्याने मोठी निराशा झाली होती. इंग्लंडचा बाशिर शेवटची ओव्हर टाकत होता. त्यानंतर लंच टाईम होता. मला वाटलं की, हीच योग्य वेळ आहे. लंच आधी आपण शतक पूर्ण करून घेऊ. त्यावेळी ऋषभच्या मनात देखील तसंच सुरू होतं. ऋषभला मला स्ट्राईक द्यायची होती, जेणेकरून मी माझं शतक पूर्ण करू शकतो. त्यामुळे त्याने मला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. पण याच गोंधळात विकेट गमावावी लागली, असं केएल राहुल म्हणाला.
advertisement
advertisement
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर शतक झळकावून राहुलने इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर दोन किंवा त्याहून अधिक शतकं झळकवणारा तो दिलीप वेंगसरकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. वेंगसरकर यांनी लॉर्ड्सवर तीन शतकं झळकावली आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG 3rd Test : नेमकी चूक कुणाची? Rahul की Rishabh? KL ने सांगितलं, गडबड कुठं झाली?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement