IND vs ENG : KL Rahul ने जोडले Rishabh समोर हात, तर गंभीरने... टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?

Last Updated:

IND vs ENG : शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने हेडिंग्ले येथे इंग्लंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर आणले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला जो पूर्णपणे चुकीचा ठरला.

News18
News18
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 20 जूनला या मालिकेचा पहिला सामना खेळला गेला ज्यात टीम इंडियाने उत्तम कामगिरी करत इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये भीतीच वातावरण निर्माण केलं. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल आणि साई सुदर्शन यांनी गोलंदाजांचा सामना केला. यशस्वी आणि शुभमनने त्यांचं शतक पूर्ण केलं तर ऋषभ पंतने अर्धशतक झळकावल.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने हेडिंग्ले येथे इंग्लंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर आणले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला जो पूर्णपणे चुकीचा ठरला. बेन स्टोक्सच्या या निर्णयाचा पुरेपूर फायदा भारताचा युवा खेळाडूंनी घेतला आणि दमदार कामगिरी केली. पहिल्या दिवशी भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने शतके झळकावली, तर दिवसअखेरीस ऋषभ पंत देखील 65 धावा करून नाबाद परतला आणि केएल राहुल ड्रेसिंग रूममध्ये हात जोडून त्याच्यासमोर उभा राहिला. बीसीसीआयने आता हा व्हिडिओ जारी केला आहे.
advertisement
राहुलने जोडले ऋषभ पंतसमोर हात
खरंतर, यशस्वी जयस्वालने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 101 धावा केल्या . यानंतर कर्णधार शुभमन गिलने 127 धावांची नाबाद खेळी केली, तर ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि पहिल्या दिवसाच्या अखेरीस 65 धावा केल्या. पंतने पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात पुढे जाऊन क्रिस वोक्सच्या चेंडूवर लेग साईडवर षटकार मारला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले की दिवसाच्या शेवटच्या षटकात असे शॉट्स फक्त पंतच मारू शकतो. हेच कारण होते की जेव्हा पंत नाबाद ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा केएल राहुल त्याच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि प्रशिक्षक गौतम गंभीरनेही नंतर त्याला मिठी मारली.
advertisement
भारताने 3 गडी गमावत 359 धावा केल्या
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने 159 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 101 धावा केल्या, त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने 175 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 127 धावा केल्या. तर ऋषभ पंतनेही 65 धावांची नाबाद खेळी केली. यासह भारताने पहिल्या दिवशी तीन विकेट गमावून 359 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने दोन विकेट घेतल्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : KL Rahul ने जोडले Rishabh समोर हात, तर गंभीरने... टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement