नागपूर निंजासने जिंकला Pro Govinda Season 3 चा चषक, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं पथक?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
प्रो गोविंदा सीझन 3 च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने (आर्यन्स गोविंदा पथक) आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3 चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर ख्रिस गेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Pro Govinda Season 3 Winner : प्रो गोविंदा सीझन 3 च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने (आर्यन्स गोविंदा पथक) आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3 चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर ख्रिस गेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रो गोविंदा सीझन 3 च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक गोवा सर्फर्स (शिवसाई गोविंदा पथक) रुपये 50 लाख , तृतीय पारितोषिक अलिबाग नाईट्स (बाल उत्साही गोविंदा पथक) रुपये 25 लाख देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित सहभागी संघांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या
सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, संगीत संयोजक सलीम - सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने सांगता कार्यक्रमास वेगळ्या उंचीवर नेले.
advertisement
प्रो गोविंदा लीगचे संस्थापक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक व त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. आपला गोविंदा सात समुद्रापलीकडे पोहचला आहे. याचा मला खूप अभिमान आहे. ख्रिस गेल यांच्या सहभागामुळे यंदाचा सीझन ग्लोबल झाला. गोविंदा खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो.
advertisement
प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले, यंदाचे पर्व आपल्या गोविंदाला ग्लोबल प्रतिष्ठा मिळवून देण्यास समर्पक ठरले आहे. सर्व गोविंदांनी अथक परिश्रम, जिद्द, संघटन कौशल्य याचे अद्भूत प्रदर्शन दाखवले. आपल्या दहीहंडी खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे आहे. हे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास यंदाच्या पर्वातून निर्माण झाला आहे.
प्रो गोविंदा सीझन ३ च्या अंतिम सामान्यात सोळा संघ सहभागी झाले होते. यंदाचा सामना अधिकच रोमहर्षक झाला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती.
advertisement
प्रो गोविंदा सीझन ३ अंतिम सामान्यासाठी क्रिकेट पटू श्रेयस अय्यर, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुंबई टी २० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 11:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
नागपूर निंजासने जिंकला Pro Govinda Season 3 चा चषक, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं पथक?