अभिषेक शर्माला 'तीन बॉलमध्ये आऊट करेन' म्हणणारा पाकिस्तानला बॉलर कोण? 152.65 च्या स्पीडने फेकतो बॉल! म्हणतो...

Last Updated:

Pakistani bowler Ihsanullah challenged abhishek sharma : जर मला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मी अभिषेक शर्माला 3 ते 6 बॉलमध्ये बाद करेन, असं एहसानुल्लाहने म्हटलं आहे.

Pakistani bowler challenged abhishek sharma
Pakistani bowler challenged abhishek sharma
Ihsanullah challenged abhishek sharma : आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या अभिषेक शर्माने कहर केला आणि टीम इंडियाचं नाव आशिया कपच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. टीम इंडियाने पाकिस्तानला तीनवेळा धूळ चारली. फायनलमध्ये देखील पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यावर अभिषेक शर्माची चर्चा झाली. अशातच आता संपूर्ण पाकिस्तानने अभिषेकची धास्ती घेतली आहे. पाकिस्तानच्या एका युवा बॉलरने थेट अभिषेक शर्माला धमकी दिलीये. अभिषेक माझ्यासमोर 3 बॉल पण टिकू शकणार नाही, असं पाकिस्तानचा युवा बॉलर म्हणाला.

152.65 किमी प्रतितास वेगाने बॉलिंग

पाकिस्तानला हा बॉलर दुसरा तिसरा कुणी नसून एहसानुल्लाह आहे. अभिषेक शर्माला पाकिस्तानी वेगवान गोलंदाज एहसानुल्लाहकडून खुलं आव्हान मिळालं आहे. हा तोच वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 2023 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये 152.65 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. जर मला भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर मी अभिषेक शर्माला 3 ते 6 बॉलमध्ये बाद करेन, असं एहसानुल्लाहने म्हटलं आहे.
advertisement

अभिषेकला माझा बॉल समजणार नाही कारण...

जर मी अभिषेक शर्माला 140 स्पीडने गोलंदाजी केली तर ते 160 स्पीडसारखं वाटेल. तो माझा बॉल समजणार नाही कारण डावखुऱ्या फलंदाजाला माझा बॉल आत येतो. माझा बॉल बाहेर जात नाही. तो आतल्या बॉलवर कॅच घेतो. डावखुरा फलंदाज कोणत्याही दिशेनं येतो तरी मी त्याच्या उजव्या खांद्यावर बाउन्सर टाकतो. माझा बाउन्सर किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती आहे, असं म्हणत एहसानुल्लाहने स्वत:चच गुनगाण गायलं आहे.
advertisement

आयसीसीच्या क्रमवारीत नंबर 1 चा फलंदाज

एहसानुल्लाहने पाकिस्तानसाठी एक वनडे आणि चार टी-२० सामने खेळले आहेत आणि टी-२० सामने सहा विकेट्स घेतल्या आहेत. 2023 च्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये दुखापतीमुळे एहसानुल्लाह बाहेर पडण्यापूर्वी त्याने चार टी-२० सामने आणि एक वनडे सामने देखील खेळले होते. तुम्हाला माहिती नसेल तर अभिषेक शर्मा सध्या आयसीसीच्या क्रमवारीत नंबर 1 चा फलंदाज आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
अभिषेक शर्माला 'तीन बॉलमध्ये आऊट करेन' म्हणणारा पाकिस्तानला बॉलर कोण? 152.65 च्या स्पीडने फेकतो बॉल! म्हणतो...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement