Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्समधला गोंधळ संपेना, एका घोषणेने पुन्हा वाद पेटला, चाहते भिडले!

Last Updated:

आयपीएल 2025 संपून फक्त दोनच महिने झाले आहेत, पण खेळाडू आणि टीम आतापासूनच आयपीएल 2026 च्या तयारीला सुरूवात करत आहेत.

राजस्थान रॉयल्समधला गोंधळ संपेना, एका घोषणेने पुन्हा वाद पेटला, चाहते भिडले!
राजस्थान रॉयल्समधला गोंधळ संपेना, एका घोषणेने पुन्हा वाद पेटला, चाहते भिडले!
मुंबई : आयपीएल 2025 संपून फक्त दोनच महिने झाले आहेत, पण खेळाडू आणि टीम आतापासूनच आयपीएल 2026 च्या तयारीला सुरूवात करत आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि चेन्नई सुपरकिंग्सचा दिग्गज खेळाडू आर.अश्विन यांनी टीमची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर येत आहे. संजू सॅमसनचे राजस्थान रॉयल्ससोबत मतभेद झाल्यामुळे त्याने टीम व्यवस्थापनाला आपल्याला रिलीज करा किंवा ट्रेड करा, अशी मागणी केली आहे, असं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. तर अश्विनने त्याला रिलीज करण्याची मागणी सीएसकेकडे का केली आहे? याचं कारण समोर आलेलं नाही.
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडे त्याला टीमची साथ सोडायची असल्याचं सांगितलं आहे. त्यातच आता राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केलेल्या एका पोस्टमुळे चाहतेही गोंधळले आहेत. राजस्थान रॉयल्सने ध्रुव जुरेल याचा फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांनी कॅप्टन जुरेल असा उल्लेख केला आहे. 'एक होगा जो स्टम्प्स के पिछे से गेम बदल देगा', असं कॅप्शन राजस्थान रॉयल्सने या फोटोला दिलं आहे.
advertisement
राजस्थान रॉयल्सच्या या पोस्टमुळे ध्रुव जुरेल नेमका कोणत्या टीमचा कर्णधार झाला आहे? याबाबत चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. एकीकडे संजूने टीमची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली असतानाच राजस्थानने ध्रुव जुरेलला कॅप्टन केल्याची पोस्ट टाकली आहे. पण जुरेलला दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनचा कर्णधार करण्यात आलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या या पोस्टमध्ये कुठेही जुरेलला दुलीप ट्रॉफीसाठी कर्णधार केल्याचं नमूद केलेलं नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. 28 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला सुरूवात होणार असून 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरदरम्यान दुलीप ट्रॉफीची फायनल होईल.
advertisement

दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोनची टीम

ध्रुव जुरेल (कर्णधार, विकेट कीपर), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मालेवार, संचित देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सारांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार, खलील अहमद

स्टॅण्ड बाय खेळाडू

माधव कौशिक, यश ठाकूर, युवराज चौधरी, महिपाल लोमरोर, कुलदीप सेन, उपेंद्र यादव
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्समधला गोंधळ संपेना, एका घोषणेने पुन्हा वाद पेटला, चाहते भिडले!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement