Rohit Sharma : फक्त क्रिकेटच नाही मनानेही राजा आहे रोहित शर्मा, VIDEO पाहून तुम्ही देखील हेच म्हणालं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आता 19 ऑक्टोबरपासून सूरूवात होणार आहे.या दौऱ्याआधी शुक्रवारी रोहित शर्माने शिवाजी पार्क मैदानावर तुफान प्रॅक्टीस केली.
Rohit Sharma Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता काही दिवसांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला आता 19 ऑक्टोबरपासून सूरूवात होणार आहे.या दौऱ्याआधी शुक्रवारी रोहित शर्माने शिवाजी पार्क मैदानावर तुफान प्रॅक्टीस केली. या प्रॅक्टीस दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशात आता एका व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ पाहून रोहित शर्मा फक्त क्रिकेटचा नाही तर मनानेही राजा आहे,असे तुम्ही देखील म्हणाल.
रोहित शर्मा शुक्रवारी अचानक शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रॅक्टीस करण्यासाठी आला होता. या घटनेची माहिती मिळताच अनेक फॅन्सनी मैदानावर तुफान गर्दी केली होती. ही गर्दी इतकी झाली होती की मैदानाला स्टेडिअमचे रूप प्राप्त झालं होतं. तसेच गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोहित शर्माला त्याचे बॉडीगार्ड मैदानात उतरवले होते.
A security guard stopped a kid a bit too harshly, Rohit immediately intervened and asked him to let the kid come. 🥹🤌🏻
Truly Ro is one of the kindest souls. ❤️
pic.twitter.com/nkiUuAN9fr
— Rohan💫 (@rohann__45) October 10, 2025
advertisement
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला मैदानात क्रिकेट खेळताना पाहून अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्यापासुन मोहत आवरत नव्हता. त्यामुळे अनेक फॅन्स रोहित सोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.पण बॉडीगार्डमुळे त्यांना रोहितपर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यातल्या एका छोट्या फॅन्सने रोहित शर्माजवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. पण एका बॉर्डीगार्डने त्याला अडवलं होतं. त्यामुळे तो रोहितचं नाव घेऊन जोरजोराने ओरडत होता. ही गोष्ट रोहितने पाहताच पहिल्यांदा तो आपल्या बॉडीगार्डवर प्रचंड भडकला आणि मुलाल आत पाठवण्यास सांगितले.
advertisement
त्यानंतर रोहित शर्माने त्या मुलाला ऑटोग्राफ दिली आणि त्यानंतर त्यांच्यासोबत फोटोही काढला.त्यामुळे रोहित शर्माने एका छोट्या फॅन्ससाठी आपल्याच बॉडीगार्डला ओरडल्याचे पाहून अनेकांच्या मनात त्याच्यासाठी असलेला आदर आणखीण वाढला आहे. तसेच रोहित क्रिकेट सोबत मनाने ही राजा असल्याचे सिद्ध झाले आहे.या संदर्भातला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची एकच चर्चा रंगली आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
advertisement
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
advertisement
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : फक्त क्रिकेटच नाही मनानेही राजा आहे रोहित शर्मा, VIDEO पाहून तुम्ही देखील हेच म्हणालं