IPL च्या 2 महिन्यातच राजस्थान रॉयल्समध्ये भूकंप, संजू सॅमसनने दिला हादरा!

Last Updated:

आयपीएल 2025 चा मोसम संपून दोन महिने होत नाहीत, तोच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का लागला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने टीमची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

IPL च्या 2 महिन्यातच राजस्थान रॉयल्समध्ये भूकंप, संजू सॅमसनने दिला हादरा!
IPL च्या 2 महिन्यातच राजस्थान रॉयल्समध्ये भूकंप, संजू सॅमसनने दिला हादरा!
मुंबई : आयपीएल 2025 चा मोसम संपून दोन महिने होत नाहीत, तोच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का लागला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने टीमची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. आयपीएल 2026 आधी मला ट्रेड करा किंवा रिलीज करा, अशी विनंती संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला केली आहे. राजस्थान रॉयल्सचं टीम व्यवस्थापन आणि संजू यांच्यात गंभीर मतभेद झाले आहेत, त्यामुळे संजूने त्याला रिलीज करण्याची किंवा दुसऱ्या टीमसोबत ट्रेड करण्याची विनंती केली आहे.
संजू सॅमसनच्या कुटुंबाकडूनही संजूला राजस्थानसोबत राहायची इच्छा नसल्याचं उघडपणे बोलून दाखवलं आहे. तसंच संजूच्या जवळ असणाऱ्या आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनीही संजूचे राजस्थान रॉयल्ससोबतचे संबंध जुन्यासारखे राहिले नसल्याचे संकेत दिले आहेत.
संजू सॅमसनचा राजस्थानसोबतचा करार 2027 पर्यंतचा आहे, पण खेळाडूची इच्छा नसताना त्याला टीममध्ये ठेवल्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण तणावग्रस्त होण्याची शक्यता बळावते, अशा परिस्थितीमध्ये राजस्थान रॉयल्सही संजूची मागणी मान्य करण्याची शक्यता आहे.
advertisement

संजूचे राजस्थानसोबत खटके

आयपीएलच्या या मोसमामध्येच संजू आणि राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये खटके उडत असल्याचं वृत्त समोर आलं होतं, यानंतर संजू या मोसमातल्या काही मॅच खेळलाही नव्हता. तसंच भारताकडून टी-20 मध्ये ओपनिंगला खेळणाऱ्या संजूला या मोसमात मधल्या फळीत बॅटिंग करावी लागली, कारण राजस्थान रॉयल्सने यशस्वी जयस्वालसोबत वैभव सूर्यवंशीला ओपनिंगची संधी दिली होती, पण संजूचे राजस्थानसोबत मतभेद व्हायचं फक्त हेच कारण नसल्याचंही क्रिकबझने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.
advertisement

चेन्नई सुपरकिंग्स संजूसाठी उत्सुक

काही फ्रॅन्चायजींनी संजू सॅमसनला ट्रेड करून टीममध्ये घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे, पण कोणत्याही फ्रॅन्चायजीला राजस्थान रॉयल्सकडून तशी ऑफर देण्यात आलेली नाही. चेन्नई सुपरकिंग्सने तर सार्वजनिकरित्या संजूला टीममध्ये घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पण संजूसाठी 18 कोटी रुपये खर्च करायला सीएसके तयार नसल्याचंही सांगण्यात येत आहे. एमएस धोनी आणि सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हे सध्या चेन्नईमध्ये आहेत, सीएसकेचे महत्त्वाचे खेळाडू आणि सीएसके व्यवस्थापनामध्ये एक बैठकही झाली आहे, पण यात संजू सॅमसनबद्दल चर्चा झाली का? याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण संजू सॅमसनला लिलावात विकत घ्यायचा प्रयत्न करू, असे संकेत सीएसकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
advertisement
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनालाही संजू सॅमसनबद्दल विचारण्यात आलं, पण त्यांनी यावर कोणतंही भाष्य करायला नकार दिला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL च्या 2 महिन्यातच राजस्थान रॉयल्समध्ये भूकंप, संजू सॅमसनने दिला हादरा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement