शुभमनला आधीच माहिती होतं 'रोहित शर्माची कॅप्टन्सी जाणार', दिल्ली टेस्टआधी प्रेस कॉन्फरेन्समध्ये केला खुलासा!

Last Updated:

Shubhman Gill On ODI Captaincy : कसोटी सामन्याच्या मध्यभागीच याची घोषणा करण्यात आली होती, पण मला त्याआधीच थोडी माहिती मिळाली होती, असं शुभमन गिल म्हणाला.

Shubhman Gill On ODI Captaincy
Shubhman Gill On ODI Captaincy
Shubhman Gill Press Conference : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुभमन गिलला टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आल्यापासून आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. बीसीसीआयने अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना खिशात घातला होता. अशातच आता दिल्ली टेस्टपूर्वी शुभमन गिलने मोठं वक्तव्य केलं आहे.

मला आधीच माहिती मिळाली होती - शुभमन

कसोटी सामन्याच्या मध्यभागीच याची घोषणा करण्यात आली होती, पण मला त्याआधीच थोडी माहिती मिळाली होती, असं शुभमन गिल म्हणाला. त्यामुळे त्याला रोहित शर्माची कॅप्टन्सी जाणार याची माहिती देखील होती. शुभमन पु़ढे म्हणतो, अर्थातच ही एक मोठी जबाबदारी आणि त्याहूनही मोठा सन्मान आहे. त्या फॉरमॅटमध्ये माझ्या देशाचे नेतृत्व करण्यास मी खूप उत्सुक आहे. आणि हो, गेल्या काही महिन्यांपासून माझ्यासाठी खूप रोमांचक आहे," असं शुभमन गिल गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणालंय.
advertisement

स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक

मी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यास आणि शक्य ते सर्व जिंकण्यास उत्सुक आहे, असं काही महिन्यांपूर्वी भारताच्या कसोटी कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या गिलने म्हटलं आहे. त्यामुळे आता शुभमन गिलची नजर सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीवर आहे का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

जे काही आहे ते जिंकायचे आहे

advertisement
दरम्यान, भविष्यात काय घडेल याची मी खरोखर उत्सुक आहे. मला शक्य तितकं मैदानावर उपस्थित राहायचे आहे आणि मी काय साध्य करू शकलो आहे किंवा एक संघ म्हणून आपण काय साध्य करू शकलो आहोत याकडे मागे वळून पाहू इच्छित नाही. मला फक्त पुढे पाहायचे आहे आणि येणाऱ्या महिन्यांत आपल्याकडे जे काही आहे ते जिंकायचे आहे, असं म्हणत शुभमन गिलने आपला गेम प्लॅन सांगितला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शुभमनला आधीच माहिती होतं 'रोहित शर्माची कॅप्टन्सी जाणार', दिल्ली टेस्टआधी प्रेस कॉन्फरेन्समध्ये केला खुलासा!
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement