दसऱ्याआधीच महिला ब्रिगेडने केलं लंकादहन, वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा धमाका!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 59 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 270 रनचं आव्हान पार करताना श्रीलंकेचा 45.4 ओव्हरमध्ये 211 रनवर ऑलआऊट झाला.
गुवाहाटी : महिला वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 59 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 270 रनचं आव्हान पार करताना श्रीलंकेचा 45.4 ओव्हरमध्ये 211 रनवर ऑलआऊट झाला. पावसामुळे हा सामना 47-47 ओव्हरचा खेळवला गेला. दीप्ती शर्माच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताचा विजय शक्य झाला. बॅटिंग करताना अर्धशतक करणाऱ्या दीप्ती शर्माने बॉलिंगमध्येही 3 विकेट घेतल्या. याशिवाय स्नेह राणा आणि श्री चारिणीला 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि प्रतिका रावलला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
श्रीलंकेकडून कर्णधार चमारी आटापटूने सर्वाधिक 43 रन केले, तर निलाक्षी डिसिल्वाने 35 आणि हर्षिता समरविक्रमाने 29 रनची खेळी केली. या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. 124 रनवरच भारताने 6 विकेट गमावल्या होत्या, पण दीप्ती शर्माने अमनजोत कौर आणि स्नेह राणाच्या मदतीने भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं,
advertisement
दीप्ती शर्माने 53 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली, तर अमनजोत कौरने 56 बॉलमध्ये 57 रन केले. स्नेह राणाने 15 बॉलमध्ये आक्रमक नाबाद 28 रन करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेलं. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांच्यामध्ये 103 रनची महत्त्वाची पार्टनरशीप झाली. श्रीलंकेकडून इनोका रनवीराने 4 विकेट घेतल्या. तर उडेशिका प्रबोधिनीला 2 आणि आचिनी कुलासुरिया, चामिरी अटापटूला 1-1 विकेट मिळाली.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
September 30, 2025 11:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दसऱ्याआधीच महिला ब्रिगेडने केलं लंकादहन, वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा धमाका!