

पॅनकार्ड हे सर्वात मोठं आयडेन्टी प्रूफ म्हणूनही वापरलं जातं. त्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. आधारकार्डपासून ते बँक खात्यापर्यंत अनेक ठिकाणी पॅनकार्ड जोडावं लागतं. पॅनकार्डवर सगळे आर्थिक व्यवहार असतात ज्यावर आयकर विभाग लक्ष ठेवून असतं. तुम्ही पॅनकार्ड ऑनलाईन अपडेट करू शकता. भारत सरकारने पॅनकार्ड 2.0 या नव्या संकल्पनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये तुमच्या पॅनकार्डवर QR कोड असणार आहे. या कोडच्या सहाय्याने तुमची सगळी माहिती स्कॅन करताच मिळून शकते. हे अधिक सुरक्षित असेल, यामुळे गैरप्रकार, फसवणूक आणि हॅकिंगच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळेल असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.