अॅपलने आणलीये धमाकेदार ऑफर! स्वस्तात मिळताय मॅकबुकसह आयफोन, पण कुठे?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही Apple iPhone, MacBook किंवा इतर Apple प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक उत्तम संधी आली आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर एक खास ऑफर लाँच केली आहे, ज्यामध्ये प्रोडक्ट्सवर ₹10,000 पर्यंत कॅशबॅक दिला जातोय.
मुंबई : तुम्हाला Apple डिव्हाइस खरेदी करण्यात रस असेल, तर कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. Apple ने भारतासह जगभरातील बाजारपेठांसाठी डिस्काउंट जाहीर केल्या आहेत. या ऑफरचा फायदा घेऊन, ग्राहक MacBook Air आणि लेटेस्ट iPhone मॉडेल्सवर ₹10,000 पर्यंत बचत करू शकतात. Apple ने किंमती कमी केल्या नाहीत, परंतु नवीन डिव्हाइसेसच्या खरेदीवर बँक ऑफर उपलब्ध आहेत.
MacBook वर किती सूट आहे?
13-इंचाचा MacBook Air M4 हा Apple च्या ऑफिशियल वेबसाइटवर ₹10,000 च्या इंस्टंट डिस्काउंटनंतर ₹89,900 मध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर ICICI, Axis आणि American Express कार्डवर लागू आहे. त्याचप्रमाणे, 14 आणि 16 इंचाच्या मॅकबुक प्रो मॉडेल्सवर ₹10,000 चं इंस्टंट डिस्काउंट मिळू शकते. डिस्काउंटनंतर, त्यांच्या किमती आता अनुक्रमे ₹1,59,900 आणि ₹2,39,900 आहेत.
advertisement
आयफोन 17 सिरीजवर किती सूट आहे?
आयफोन 17 सिरीज मॅकबुकपेक्षा कमी कॅशबॅक देते. आयफोन 17 फक्त ₹1,000 कॅशबॅक देत आहे. या आयफोनला जास्त मागणी आहे आणि सध्या बहुतेक प्लॅटफॉर्मवर स्टॉक संपला आहे. स्टॉकमध्ये सुधारणा झाल्यानंतर जास्त कॅशबॅकची अपेक्षा केली जाऊ शकते. प्रो मॉडेल्स निवडक कार्ड्स वापरून ₹5,000 कॅशबॅकसह उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे, आयफोन 16 आणि 16 प्लस मॉडेल्सना दर कपातीव्यतिरिक्त ₹4,000 पर्यंत कॅशबॅक मिळतेय.
advertisement
या प्रोडक्ट्सवर देखील मिळताय फायदे
मॅकबुक आणि आयफोन व्यतिरिक्त, इतर कंपनीच्या प्रोडक्ट्सवर देखील कॅशबॅक मिळू शकतो. कंपनी वॉच सिरीज 11 वर 4,000 रुपये, अॅपल वॉच SE 3 वर 2,000 रुपये आणि एअरपॉड्स प्रो 3 आणि प्रो 4 वर 1,000 रुपये कॅशबॅक देत आहे. अॅपल वॉचच्या खरेदीवरील कॅशबॅक व्यतिरिक्त, अॅपल अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करताना तीन महिन्यांसाठी अॅपल म्युझिकचे फ्री सबस्क्रिप्शन आणि तीन महिन्यांसाठी अॅपल टीव्हीचे फ्री सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 5:03 PM IST


