Gmail च्या 'या' सेटिंगने हवे ते Contact पुन्हा मिळवा, फक्त ही एक ट्रिक तुमचं काम करेल सोपं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जीमेलमध्ये लोकांचा महत्वाचा डेटा असतो. त्यामध्ये फोननंबर, फोटो, चॅट बॅकअप सारख्या गोष्टी आहेत. शिवाय फोन हरवला तरी तो सेटिंग्सच्या माध्यमातून शोधता येतो.
मुंबई : Gmail ही आता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे कोणत्याही फोन वापरणाऱ्या व्यक्तीचा जीमेल अकाउंट असतोच. फोन किंवा कंप्यूटर हा जीमेल शिवाय वापरता किंवा एक्सेस करता येत नाही. त्यामुळे हा प्रत्येकाकडे असतो. या जीमेलमध्ये लोकांचा महत्वाचा डेटा असतो. त्यामध्ये फोननंबर, फोटो, चॅट बॅकअप सारख्या गोष्टी आहेत. शिवाय फोन हरवला तरी तो सेटिंग्सच्या माध्यमातून शोधता येतो.
असंच काहीचं नंबर किंवा कॉन्टॅक्टच्या बाबतीत देखील घडतं. लोक त्यांच्या स्मार्टफोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नंबर सेव्ह करतात. मग जेव्हा त्यांना कुणाला फोन करायचा असेल तेव्हा ते त्यांचा नंबर सहज शोधून त्यांना कॉल करू शकतात. परंतु, मोबाईल फोनवरून चुकून एखादा संपर्क डिलीट झाला, तर मात्र एखाद्यासाठी ती डोकेदुखी ठरू शकते.
तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही Gmail च्या मदतीने हटवलेले संपर्क सहजपणे रिस्टोअर करू शकाल.
advertisement
Gmail खात्याशी फोननंबर लिंक करा
तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या फोनमध्ये नंबर सेव्ह करता तेव्हा तुम्हाला तो नंबर तुमच्या Gmail अकाउंटमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय मिळतो. वास्तविक, मोबाईल फोनची संपर्क यादी जीमेल खात्याशी जोडलेली असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही तुमच्या जीमेल आयडीने नवीन फोनवर लॉग इन करता, तेव्हा तुमचे सर्व संपर्क आणि Google ड्राइव्हमध्ये सेव्ह केलेला डेटा आपोआप त्या फोनवर येतो.
advertisement
रीसायकल बिन जेव्हा जेव्हा फोनवरून संपर्क हटविला जातो तेव्हा तो कायमचा हटविला जात नाही. त्याऐवजी, तो क्रमांक रीसायकल बिनमध्ये जातो. येथून तुम्ही तो नंबर रिकव्हर करू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? चला स्टेपबाय स्टेप पाहू
1. तुमच्या Gmail खात्याने तुमच्या कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर लॉग इन करा.
2. Gmail च्या मेन पेजच्या वरच्या डाव्या कोपर्यात असलेल्या 3 ओळींवर क्लिक करा.
advertisement
3. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
4. स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि Contact पर्यायावर क्लिक करा.
5. यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला सेव्ह केलेल्या Contact ची यादी दिसेल.
Gmail वरुन Contact Delete झालं तर पुढची स्टेप काय?
1. तुमच्या Gmail खात्याने तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर लॉग इन करा.
advertisement
2. Gmail मेन पेजच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या 3 ओळींवर क्लिक करा.
3. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
4. स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि संपर्क पर्यायावर क्लिक करा.
5. यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला सेव्ह केलेल्या कॉन्टॅक्टची यादी दिसेल.
6. स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात तुम्हाला ऑर्गनाइज टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.
advertisement
7. येथे तुम्हाला Bin पर्यायावर क्लिक करावे लागेल.
8. येथे तुम्हाला पुनर्प्राप्त करायचे असलेले संपर्क निवडा.
9. Contact परत आणण्यासाठी, तुम्हाला पुनर्प्राप्त पर्यायावर क्लिक करावे लागेल.
10. यानंतर तुमचे निवडलेले Contact तुमच्या Contact यादीत परत येतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Gmail च्या 'या' सेटिंगने हवे ते Contact पुन्हा मिळवा, फक्त ही एक ट्रिक तुमचं काम करेल सोपं