जालना : आपल्या देशाला जसा भूगोल लाभला आहे. तसाच वैविध्यपूर्ण इतिहास देखील लाभला आहे. अनेक लोकांना ऐतिहासिक वस्तू, घटना, प्रसंग इत्यादींची आवड असते. अनेक लोक आपल्या इतिहासावर गर्व करतात. त्यापैकी काही जण हे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत असतात. जालन्यातील इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे ही मागील अनेक वर्षांपासून अनेक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करून ठेवत आहेत. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, होळकर शाहीतील दुर्मिळ छायाचित्रे तसेच सुभेदार मल्हारराव होळकर यांची शाही पगडी इत्यादी गोष्टींचा संग्रह आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण पगडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
Last Updated: November 13, 2025, 15:10 IST