अयोध्येचं निमंत्रण मिळताच माकडाची अशी होती रिएक्शन, Video सोशल मीडियावर ट्रेंड

Last Updated:

या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका जेव्हा एका माकडाला दिली गेली, तेव्हा या माकडाची रिएक्शन पाहण्यासारखी होती.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे प्राण्यांसंबंधीत देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी प्राण्यांच्या मनोरंजक रिएक्शनचे असतात. तर कधी हे व्हिडीओ धोकादायक शिकारी असतात. सध्या एका माकडाचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
22 जानेवारीला रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, यासाठी देशभरातील लोकांना निमंत्रीत केलं गेलं, त्यासाठी आमंत्रित पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. या दिवशी आपण ही अयोध्येत असावं असं प्रत्येक हिंदू भारतीयाला वाटत आहे.
या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका जेव्हा एका माकडाला दिली गेली, तेव्हा या माकडाची रिएक्शन पाहण्यासारखी होती. या माकडाने जणू काही ती पत्रिका आपल्या छातीला लावून रामाला आठवलं. तुम्ही त्या माकडाची रिएक्शन व्हिडीओमध्ये पाहू शकता.
advertisement
खरंतर माकडाला आपण हनुमानाचं रुप मानतो आणि हनुमान का रामाचा खुप मोठा भक्त आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे निमंत्रणाची पत्रिका मिळाल्यावर माकडाची अशी रिएक्शन पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर kamleshwar_singh_sanatni या अकाउंटवरुन व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे आणि कधी काढला गेला? हे कळू शकलेलं नाही. परंतू आता रामललाच्या प्रतिष्ठापनादरम्यानच्या काळात हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. तर काही लोक आपल्या मित्रांना देखील हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
अयोध्येचं निमंत्रण मिळताच माकडाची अशी होती रिएक्शन, Video सोशल मीडियावर ट्रेंड
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement