बापरे! पृथ्वीवर ही काळी सावली कशाची? धडकी भरवणारा VIDEO होतोय VIRAL

Last Updated:

Earth Video Viral : युरोपियन स्पेस एजन्सीच्या कॅमेऱ्यात पृथ्वीचं हे दृश्य कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पृथ्वी फिरते आहे आणि पृथ्वीचा निम्मा भाग काळा झालेला दिसतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : अवकाशात बऱ्याच घटना घडत असतात. काही तर आपल्याला समजतसुद्धा नाहीत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. पृथ्वीवर एक काळ्या रंगाची सावली पडताना दिसली आहे. पृथ्वीवरील ही काळी सावली नेमकी कशाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या कॅमेऱ्यात पृथ्वीचं हे दृश्य कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पृथ्वी फिरते आहे आणि पृथ्वीचा निम्मा भाग काळा झालेला दिसतो आहे.
या व्हिडिओमध्ये आफ्रिकन खंड दाखवला आहे. पृथ्वीचा एक भाग कसा अंधारात आणि दुसरा भाग प्रकाशात व्यापलेला आहे. दिवस जसजसा पुढे जातो तसतसे प्रकाशाच्या ठिकाणी आणि अंधाराच्या ठिकाणी हालचाल दिसून येते. हे दृश्य 21 जूनचं आहे.
advertisement
आता हे काय आहे याची माहितीही ईएसएने त्यांच्या अधिकृत X हँडलवर दिली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे. "उन्हाळी संक्रांतीच्या शुभेच्छा! या वर्षीचा संक्रांतीचा दिवस अगदी पहाटे 4:42 वाजता आला. या क्षणी सूर्य आकाशातील त्याच्या सर्वात उत्तरेकडील बिंदूवर पोहोचला. अवकाशातून पाहिल्यास पृथ्वी खूपच वेगळी दिसते. हे दृश्य एका जून संक्रांतीपासून दुसऱ्या जून संक्रांतीपर्यंत वर्षभर बदलणारे प्रकाश आणि सावल्या दर्शवतं.  आपल्या पृथ्वीच्या कक्षेत या टप्प्यावर दिवस-रात्र रेषा ज्याला टर्मिनेटर म्हणून ओळखलं जातं त्याच्या सर्वात नाट्यमय कोनात झुकलेली असते. उत्तर गोलार्धात हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस असतो तर दक्षिण गोलार्धात हा सर्वात लहान दिवस असतो.
advertisement
advertisement
एकंदरच काय तर पृथ्वीवरील या काळ्या सावलीला घाबरण्याची गरज नाही. हे कोणतं संकट नाही. तर 21 जून हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस. आर्क्टिक सर्कलवर 24 तास सूर्य चमकतो. या खगोलीय घटनेला मध्यरात्रीचा सूर्य असंही म्हणतात. याचा अर्थ असा की रात्रीही लोक सूर्य पाहू शकतात.
तर दक्षिण गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस. अंटार्क्टिक सर्कलवर म्हणजेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात सूर्य 24 तास पूर्णपणे लपलेला राहतो. इथं 'ध्रुवीय रात्र' अनुभवली जाते. सोप्या शब्दांत सांगायचं तर इथं सूर्य उगवत नाही. दिवस असो वा रात्र, फक्त अंधार असतो.
advertisement
आपली पृथ्वी 23.5 अंशांनी झुकलेली आहे. त्यामुळे दर तीन महिन्यांनी सूर्याभोवती फिरणारी आपली पृथ्वी वेगवेगळ्या खगोलीय घटनांमधून जाते. ईएसएने अवकाशातून ही खगोलीय घटना कैद केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप आवडला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बापरे! पृथ्वीवर ही काळी सावली कशाची? धडकी भरवणारा VIDEO होतोय VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement