सुहागरात नववधूसाठी ठरलं 'शाप'? नवरदेवाचं असं सत्य समोर आलं, लगेच माहेरी लावला कॉल

Last Updated:

एका नववधूने आपल्या पतीवर धक्कादायक आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. तिचं म्हणणं आहे की, तिच्या सासरच्यांनी केवळ हुंड्यासाठी आपल्या मुलाचं लग्न केलं आणि तिचं आयुष्य अंधारात ढकललं.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : लग्न म्हणजे दोन जीवांचं नातं, जे विश्वास आणि प्रेमावर उभं रहातं. पण जेव्हा हाच विश्वास फसवणुकीच्या वाटेवर जातो, तेव्हा लग्न आयुष्याचं सुख न राहता, एक भयंकर अनुभव बनतो. अशीच एक घटना समोर आली आहे, जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतेय. एका नववधूने आपल्या पतीवर नपुंसक असल्याचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली आहे. तिचं म्हणणं आहे की, तिच्या सासरच्यांनी केवळ हुंड्यासाठी आपल्या मुलाचं लग्न केलं आणि तिचं आयुष्य अंधारात ढकललं.
नक्की हे प्रकरण काय?
मार्च 2024 मध्ये रावतपूरमधील महिलेचं उन्नावमधील एका युवकाशी लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला समजलं की तिचा पती शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. जेव्हा तिने हे आपल्या जेठानीकडे सांगितलं, तेव्हा तिला दुर्लक्षित करण्यात आलं. काही दिवसांनी जेव्हा तिने पुन्हा हा विषय काढला, तेव्हा सासरच्यांनी शिवीगाळ केली आणि नंतर स्वीकारलं की त्यांना ही गोष्ट आधीच माहित होती आणि हे लग्न केवळ हुंड्यासाठी केलं होतं.
advertisement
पतिचं उपचार करावं अशी विनंती करताच सासरच्यांनी तिला 2 लाख रुपयांची मागणी केली. एवढंच नाही, तर तिच्या दिरानं तिच्यावर वाईट नजर ठेवायला सुरुवात केली आणि छेड काढली. विरोध करताच तिच्यावर हात उचलण्यात आला.
तिला माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी तिला एका ठिकाणी बोलावलं गेलं, पण त्याठिकाणीच तिला गळफास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती कसाबसा आपला जीव वाचवून तिथून पळाली आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
advertisement
सध्या पती, जेठ आणि जेठानी यांच्याविरोधात गंभीर आरोपांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हि घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर समाजात अजूनही हुंड्यासारख्या विषारी प्रथा किती खोलवर रुजलेल्या आहेत, हे दाखवते. महिलांच्या सुरक्षेसाठी, फसवणूक रोखण्यासाठी आणि मानसिक/शारीरिक हिंसाचार थांबवण्यासाठी यंत्रणांनी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/Viral/
सुहागरात नववधूसाठी ठरलं 'शाप'? नवरदेवाचं असं सत्य समोर आलं, लगेच माहेरी लावला कॉल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement