Fastag Annual Pass : 200 ट्रिपचं काय आहे गणित? एकाच रस्त्यावर ये-जा केलं तर ती 1 ट्रीप पकडली जाणार की 2?

Last Updated:

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या नव्या धोरणानुसार, आता खासगी वाहनांसाठी एक "FASTag वार्षिक पास" (Annual Pass) उपलब्ध करून दिला जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : हायवेवरून प्रवास करताना टोल प्लाझावर पैसे देणं ही आता आपल्यासाठी नित्याची बाब झाली आहे. भारतात लाखो लोकं दररोज हायवेवरून प्रवास करतात आणि प्रत्येक टोल नाक्यावर त्यांना FASTag द्वारे टोल आकारला जातो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक नवीन योजना जाहीर केली आहे, जी वारंवार हायवेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
नवीन FASTag Annual Toll Pass काय आहे?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या या नव्या धोरणानुसार, आता खासगी वाहनांसाठी एक "FASTag वार्षिक पास" (Annual Pass) उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. शिवाय ही योजना खासगी, नॉन-कॉमर्शियल कार, जीप, SUV, व्हॅनसाठी असणार आहे.
advertisement
या वर्षिक पासची किंमत आणि सुविधा ₹3,000 रुपये आहे. ज्यासाठी प्रवेश मर्यादा 200 टोल ट्रिप्सची आहे, तसेच हा टोल 1 वर्षांसाठी वॅलिड असेल. पण हे लक्षात घ्या की 200 ट्रीप्स किंवा 1 वर्ष दोघांपैकी जे आधी येईल तेव्हा तो पास संपेल.
पास कुठून खरेदी करायचा?
Rajmarg Yatra App, NHAI किंवा मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन प्रोसेसद्वारे अ‍ॅक्टिव्हेशन आणि रिन्युअल सहज शक्य आहे.
advertisement
कॉस्टिंगचे गणित: नियमित टोलपेक्षा किती फायदेशीर?
सध्या एका टोल नाक्याचा मासिक पास ₹340 इतका असतो. म्हणजे वर्षभरात ₹4,080 फक्त एकाच टोल प्लाझासाठी लागतात.
ही ट्रीप काउंट कशी होणार? राउंड ट्रीप की सिंगल ट्रीप?
अनेकांच्या मनात या 200 ट्रीपबद्दल एक प्रश्न उपस्थीत आहे की ही राउंड की सिंगल कशी ट्रिप काउंट होईल?
advertisement
पॉइंट बेस्ड टोल नाक्यांसाठी :
प्रत्येक टोल नाक्यावरून एकदाचा प्रवास (Single) एक ट्रिप म्हणून गणली जाईल
जर तुम्ही पुढे जाऊन परत येत असाल (round trip), तर ती दोन ट्रिप्स म्हणून मोजली जाते.
क्लोज्ड टोलिंग टोल नाक्यांसाठी :
एका प्रवासात एन्ट्री पॉइंट आणि दुसरं exit पॉइंट असल्यास, तो एक ट्रिप म्हणून गणला जातो.
advertisement
क्लोज्ड टोलिंग म्हणजे काय?
तर जेव्हा तुम्ही एका टोन नाक्याला तिन ते चार वेगवेगळे एक्जिट पॉइंट असतात आणि या एक्स्जिट पॉइंटला देखील टोल नाका असतो, जिथे तुम्हाला एन्ट्रीच्यावेळी मिळालेलं तिकिट दाखवून बाहेर पडू शकता.
पण या नवीन FASTag Annual Pass मध्ये: ₹3,000 मध्ये तुम्हाला 200 टोल ट्रिप्स मिळतात, शिवाय यात कोणताही राष्ट्रीय टोल प्लाझा वापरता येतो. याचा अर्थ, अनेक हायवेवर नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आणि सोपी आहे.
advertisement
कमी प्रवास करणाऱ्यांसाठी पर्याय
जर तुम्ही फारसे प्रवास करत नसाल, तर सरकार लवकरच एक "प्रवासाच्या अंतरावर आधारित टोल" (Distance-based Toll) स्कीम आणणार आहे.
या Annual Toll योजनेचा उद्देश काय?
टोल देताना वेळेची बचत, वाहतूक कोंडी टाळणे, डिजिटल व्यवहारांना चालना, प्रवाशांना एकसंध आणि पारदर्शक अनुभव देणे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Fastag Annual Pass : 200 ट्रिपचं काय आहे गणित? एकाच रस्त्यावर ये-जा केलं तर ती 1 ट्रीप पकडली जाणार की 2?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement