पत्नीने पतीचं ते सिक्रेट सासू-सासऱ्यांना सांगितलं, नवऱ्याने दाखल केला खटला, मागितले 80 लाख रूपये
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
इथे राहणार्या अमेरिकन माणसानं जानेवारी 2023 मध्ये लॉटरी जिंकली आणि ही काही छोटी रक्कम नव्हती. ती 1.35 अब्ज डॉलर इतकी मोठी होती. त्या व्यक्तीला ही लॉटरीची बातमी सर्वांपासून लपवून ठेवायची होती
नवी दिल्ली 30 नोव्हेंबर : नशीब चांगलं असतं तेव्हा एखाद्याची लॉटरी लागते, असं म्हणतात. नशीब चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच जग जिंकू शकता, असं म्हटलं जातं. तुम्ही आजपर्यंत याच्याशी संबंधित अनेक किस्से आणि कथा वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरं तर इथे असं झालं की एका माणसाने लॉटरीवरून आपल्याच पत्नीवर खटला दाखल केला.
प्रकरण अमेरिकेचं आहे. इथे राहणार्या अमेरिकन माणसानं जानेवारी 2023 मध्ये लॉटरी जिंकली आणि ही काही छोटी रक्कम नव्हती. ती 1.35 अब्ज डॉलर इतकी मोठी होती. त्या व्यक्तीला ही लॉटरीची बातमी सर्वांपासून लपवून ठेवायची होती. यामुळेच त्यानी याबाबत कोणालाच काही सांगितलं नाही. ही माहिती त्याने फक्त आपल्या पत्नीलाच दिली. पण लॉटरी जिंकल्यानंतर काही वेळातच त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला
advertisement
कारण लॉटरी जिंकल्याचं पत्नीला सांगितल्यावर त्यांच्यामध्ये यादरम्यान एक अट होती, की पत्नी या लॉटरीबद्दल जून 2032 पर्यंत कोणालाही काहीही सांगणार नाही. परंतु त्याच्या पत्नीने ही माहिती गुप्त ठेवली नाही आणि घरामध्ये सांगितली. 8 फेब्रुवारी 2023 रोजी यासंबंधीचा करारही करण्यात आला होता आणि त्याअंतर्गत 1 जून 2032 पर्यंत या प्रकरणाचा कुठेही उल्लेख करायचा नव्हता. यामध्ये मुलीचं नाव देखील समाविष्ट करण्यात आलं होतं. कारण हप्त्यांमध्ये बक्षीस घेण्याऐवजी त्या व्यक्तीने $723,564,144 (करानंतर) एकाच वेळी घेतले. दोघे विभक्त होताच मुलाच्या वडिलांना आणि सावत्र आईला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही बातमी त्यांच्या नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
बिझनेस इनसाइडरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरुद्ध करार मोडल्याबद्दल याचिका दाखल केली आहे. न्यायाधीशांसमोर ही वस्तुस्थिती उघड करण्यासाठी किमान $100,000 खर्च येईल. ही किंमत 80 लाख असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 8:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
पत्नीने पतीचं ते सिक्रेट सासू-सासऱ्यांना सांगितलं, नवऱ्याने दाखल केला खटला, मागितले 80 लाख रूपये